इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतात लवकरच Poco X4 – 5G लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन 108MP कॅमेरा घेऊन येईल. तसेच तो 6GB RAM सह जोडलेला आहे. हा फोन आधीच इतर अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट्सवर दिसला आहे. या फोनमध्ये सिंगल-कोर टेस्टमध्ये 688 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 2,052 पॉइंट मिळाले आहेत. तसेच हा Poco फोन रिब्रँडेड Redmi Note 11 Pro 5G सारखा असण्याची शक्यता आहे. यापूर्वी Poco ने Redmi Note 11 ची चीनी आवृत्ती Poco M4 Pro 5G म्हणून जागतिक स्तरावर रिलीज केली आहे. दरम्यान, पूर्वीच्या अहवालात असे सुचवण्यात आले होते की, Poco X4 5G ही Redmi Note 11 Pro 5G ची पुनर्ब्रँडेड आवृत्ती असू शकते.
फोनने अलीकडेच ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 SoC सह जागतिक पदार्पण केले आहे. हे तीन स्टोरेज प्रकारांमध्ये 6GB + 64GB, 6GB + 128GB आणि 8GB + 128GB मध्ये सादर केले गेले आहे. विशेष म्हणजे सदर कंपनी या फोनमध्ये, 120Hz च्या रीफ्रेश दर आणि 1200 nits च्या शिखर ब्राइटनेससह 6.67-इंच फुल एचडी + AMOLED डिस्प्ले देऊ शकते. यासोबतच हा फोन 6GB रॅम आणि 8GB रॅम देऊ शकतो. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये 108MP प्राथमिक लेन्ससह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड स्नॅपर आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश असू शकतो. यासोबतच सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. तसेच 5000mAh बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो.