शनिवार, मे 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वन विभागाच्या परीक्षेत गैरप्रकार झाला की नाही… वन विभागाने केला हा मोठा खुलासा

by India Darpan
ऑगस्ट 5, 2023 | 5:24 am
in राज्य
0
mahaforest

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वनविभागातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गाची भरती प्रक्रिया टी.सी.एस.- आय.ओ. एन. यांच्यामार्फत 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन परीक्षेद्वारे (ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न) घेण्यात येत आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रश्नपत्रिका शिफ्टनिहाय वितरण करणे, परीक्षा घेणे, निकाल प्रकाशित करणे याबाबतची टीसीएस आयओएन या कंपनीची यंत्रणा ही अत्यंत गोपनीय मजबूत व अत्यंत सुरक्षित आहे. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या बातम्या निराधार, तथ्यहीन व चुकीच्या असल्याचा खुलासा वनविभागाने केला आहे.

वनविभागाची परीक्षा टी.सी.एस.आय.ओ.एन. या कंपनीकडून घेण्यात येत असून वनविभागाकडून परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त लावणे तसेच वरिष्ठांकडून परीक्षा केंद्राची तपासणी करण्याच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. याव्यतिरिक्त उमेदवारांना व नागरिकांना https://mahaforest.gov.in/ या संकेतस्थळावरूनही सूचनावजा आवाहन करण्यात आले असून अतिरिक्त दक्षता घेण्यात आली आहे. याचबरोबर नागपूर येथून परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची गंभीरतेने दखल घेण्यात आली आहे.

याप्रकरणी सतर्क राहण्याबाबत पोलीस आयुक्त, नागपूर शहर, पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण, पोलीस अधीक्षक, वर्धा, पोलीस अधीक्षक, भंडारा व पोलीस अधीक्षक गोंदिया यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच पोलीस विभागाच्या सायबर सेललासुद्धा सतर्क राहण्याचे व भरती प्रक्रियेसंदर्भात समाज माध्यमांमध्ये अफवा पसरवणाऱ्यांवर आवश्यक कार्यवाही करण्याच्याही सूचना देण्यात आलेल्या असल्याचे वनविभागाने कळविले आहे.

माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या घटना औरंगाबाद जिल्ह्यातील नेमून दिलेल्या सात परीक्षा केंद्रांवरील नसून ती खासगी अॅकेडमी असून त्याबाबत पोलीस यंत्रणेकडून तपास सुरू आहे यामध्ये उल्लेखित राणा अॅकेडमी परीक्षा केंद्राचा वन विभागाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रामध्ये समावेश नसल्याचे, वन विभागाने स्पष्ट केले आहे. या परीक्षेदरम्यान गैरकृत्य करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध रीतसर पोलीस कारवाई करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे. यासंदर्भात वन विभागाचे कक्ष अधिकारी वि. श. जाखलेकर यांनी खुलासा प्रसिद्धीस दिला आहे.

forest department recruitment exam clarification

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बलात्कारावेळी महिलेने विरोध का केला नाही? हायकोर्टाकडून आरोपीची निर्दोष मुक्तता

Next Post

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील जखमींनी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यास… सरकारने काढला हा आदेश…

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील जखमींनी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यास... सरकारने काढला हा आदेश...

ताज्या बातम्या

bjp11

आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट…भाजपच्या या आमदारांविरुध्द काँग्रेसची तक्रार दाखल

मे 24, 2025
Untitled 46

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मे 24, 2025
Election 4 1140x571 1

केंद्रीय निवडणूक आयोग मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

मे 24, 2025
NMC Nashik 1

दिवाबत्तीच्या खांबात असतो ४४० व्होल्टचा वीजपुरवठा…नाशिक महानगरपालिकेने दिला हा इशारा

मे 24, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित…

मे 24, 2025
bhujbal 11

अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याची जबाबदारी…

मे 24, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011