शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

फुटबॉल विश्वचषक : विजेतेच नाही, गोल्डन बूटसह सहभागी होणारे संघही मालामाल; बघा, कुणाला किती मिळाले पैसे?

डिसेंबर 19, 2022 | 4:32 pm
in संमिश्र वार्ता
0
FkSODSPXkAIWB3W

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अर्जेंटिनाच्या लियोनेल मेस्सीचं फिफा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अखेर कतारच्या लुसेल स्टेडियमवर साकार झालं. फिफाच्या अंतिम सामन्यात मेसीच्या अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४ – २ असा पराभव करत फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. याआधी हा सामना जादा वेळेत ३ – ३ असा आणि निर्धारित वेळेत २ – २ असा बरोबरीत सुटला होता. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात विजेतेपद पटकावण्याची अर्जेंटिनाची ही तिसरी वेळ असून याआधी अर्जेंटिनानं १९७८ आणि १९८६ साली विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर तब्बल ३६ वर्षांनी मेसीच्या अर्जेंटिनानं विश्वचषकावर पुन्हा आपलं नाव कोरलं आहे.

फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ मानला जातो. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष फिफा विश्वचषक २०२२कडे लागलं होतं. विश्वचषक ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला विजेतेपदासह कोट्यवधी रुपयांची प्राईज मनीही मिळाली आहे. केवळ विजेता संघच नाही तर उपविजेता संघही मालामाल झाला आहे. यासोबतच फिफामधील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांनाही एक ठराविक रक्कम फिफाकडून दिली जाते.

अशी आहे प्राईज मनी
विजेता अर्जेंटीना : ३४७ कोटी रुपये,
उपविजेता फ्रांस : २४८ कोटी रुपये,
तिसऱ्या क्रमांकावरील टीम : २२३ कोटी रुपये (क्रोएशिया),
चौथ्या क्रमांकावरील टीम : २०६ कोटी रुपये (मोरक्को)

सहभागी संघांना
केवळ नॉकआउट सामन्यांत पोहोचणाऱ्या संघांनाच नाही तर विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनाही फिफाकडून काही रक्कम दिली जाते. कोणत्या संघांना किती रक्कम मिळाली. विश्वचषक स्पर्धेत सहभागी प्रत्येक संघाला ९ – ९ मिलियन डॉलर (दशलक्ष डॉलर्स) प्री – क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेल्या संघांसाठी १३ मिलियन डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळाली आहे. क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झालेल्या संघांसाठी १७ मिलियन डॉलर्स बक्षीस रक्कम मिळाली आहे. विश्वचषकादरम्यान फिफाकडून एकूण ३६४१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही रक्कम सहभागी संघांना बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक संघाचा सहभाग, सामना जिंकणं, गोल शुल्क आणि विजेता संघ, उपविजेता संघ आणि बाद फेरीत पोहोचलेल्या संघांची रक्कम यांचा समावेश आहे.

फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात हेड – टू – हेड
एकूण सामने : १३
अर्जेंटिनाचा विजय : ७ वेळा
फ्रान्सचा विजय : ३ वेळा
ड्रॉ : ३ वेळा

अर्जेंटीना स्क्वॉड
गोलकीपर : एमिलियानो मार्टिनेज, गेरोनिमो रुल्ली, फ्रेंको अरमानी.
डिफेंडर : नहुएल मोलिना, गोंजालो मोंटिएल, क्रिस्टियन रोमेरो, जर्मन पेजेला, निकोलस ओटामेंडी, लिसेंड्रो मार्टिनेज, मार्कोस एक्यूना, निकोलस टैगेलियाफिको, जुआन फोयथ.
मिडफील्डर: रोड्रिगो डी पॉल, लिएंड्रो परेडेस, एलेक्सिस मॅकएलिस्टर, गुइडो रोड्रिग्ज, एलेजांद्रो गोमेज, एंजो फर्नांडीज, एक्सेक्विएल पलासियोस.
फॉरवर्ड: लियोनेल मेसी, एंजेल डि मारिया, लुटारो मार्टिनेज, जूलियन अल्वारेज, निकोलस गोंजालेज, जोकिन कोरिया, पाउलो डायबाला.

फ्रान्स स्क्वॉड
गोलकीपर: अलफोंसे एरिलो, ह्यूगो लॉरिस, स्टीव मनडाडा
डिफेंडर: लुकास हर्नांडेज, थियो हर्नांडेज, इब्राहिम कोनाते, जूल्स कोंदे, बेंजामिन पावर्ड, विलियम सालिबा, दायोत उपामेकानो, राफेल वराने
मिडफील्डर: एडुआर्डो कॅमाविंगा, यूसुफ फोफाना, मेटियो गुंदॉजी, एड्रियन रेबियट, ऑरेलियन टचॉमेनी, जोर्डन वेरेटॉट
फॉरवर्ड: करीम बेंजेमा, किंग्स्ली कोमेन, उस्माने डेम्बले, ओलिविर जिरूड, एंटोनी ग्रीजमॅन, कीलियन एम्बाप्पे, मार्कस थुरम, रँडल कोलो मुआनी

FIFA Football World Cup Price Money Winner Participant
Sports

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घरफोडीचे सत्र सुरुच; शहरात चार घरफोडीच्या घटना, १७ लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास

Next Post

धक्कादायक: पती -पत्नीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
sucide 1

धक्कादायक: पती -पत्नीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011