नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राहत्या घरात पती -पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाथर्डी फाटा येथे घडली आहे. गौरव जितेंद्र जगताप (वय २९) व नेहा गौरव जगताप (वय २३, दोघेही रा. अनमोल नयनतारा सोसायटी, पाथर्डी फाटा, नाशिक) अशी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत.
या दाम्पत्याने काल रात्री साडेआठ वाजेच्या आसपास हॉलमध्ये असलेल्या सिलिंगच्या हुकाला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्ये मागील कारण समजू शकले नाही. जगताप यांचे भाऊ व मावशी हे या दाम्पत्याला फोन करत होते. मात्र, जगताप दांम्पत्य फोन घेत नसल्यामुळे नातेवाईकांना शंका आली. त्यांनी घराकडे धाव घेतली. भाऊ यश जगताप व काका अरुण गवळी हे घरी पोहचले. दरवाजा उघडत नसल्यामुळे नागरिकांच्या मदतीने त्यांनी घराचा दरवाजा तोडण्यात आला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद इंदिरा नगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार देवरे करीत आहेत.