India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांनी भेट दिली तेथेच संतप्त शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन… ‘शेतकऱ्यांचे मरण, हेच शासनाचे धोरण’, अशी घोषणाबाजी

नुकसान भरपाई, व शेतमाल भाववाढीसाठी डांगसौंदाणेत आंदोलन

India Darpan by India Darpan
May 19, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

निलेश गौतम, सटाणा
शेतकऱ्यांचे मरण हेच शासनाचे धोरण आहे.तब्बल दीड महिना उलटूनही गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना कुठलीही मदत जाहीर झाली नसल्याने आज डांगसौंदाणे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी आक्रमक होत बाजार समितीचे संचालक व शेतकरी नेते संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली येथील केळझर फाट्यावर तीव्र असे आंदोलन करीत रास्ता रोको केला.

9 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान झालेल्या गारपीट व अवकाळीने या भागातील शेती पूर्णपणे नेस्तनाबूत झाली आहे.या भागातील प्रमुख पीक असलेले उन्हाळ कांदा हा या गारपिटीने संपूर्णपणे जमिनीतच सडला तर टोमॅटो ,मिरची पीक भुईसपाट झाल्याने या भागातील शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गत ७० वर्षात अशी गारपीट झाली नसल्याचे ज्येष्ठांनी सांगितले या गारपीटीची दखल स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घेत थेट बागलाणच्या शेती बांधावर येऊन या नुकसानीची पाहणी करून प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र पंचनामेचा सोपस्कार पूर्ण होऊन महिना उलटला तरीही शासनाने अद्याप पर्यंत शेतकऱ्याना कुठलीही आर्थिक मदत जाहीर केलेली नाही.

तब्बल दीड महिना उलटून ही नुकसान भरपाई मिळत नसल्याने आज शुक्रवार दिनांक 19 रोजी सकाळी 11 वाजता डांगसौंदाणेसह पंचक्रोशीतील निकवेल, चा. पाडे, दहिंदुले, भिलदर ,तळवाडे, साकोडे आदी गावातील शेतकऱ्यांनी आक्रमक होत राज्य सरकारच्या विरोधात तीव्र असे रास्ता रोको आंदोलन छेडले या आंदोलनात या शेतकऱ्यांनी आक्रमक होत भीक नको हवे घामाचे दाम असे म्हणत राज्य शासनाला जाब विचारण्याची वेळ आल्याचे बोलून दाखविले यावेळी येथील शेतकरी गोविंद चिंचोरे यांनी आंदोलनात बोलताना सांगितले की, शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण असून शेतकरी राजा आता राजा राहिला नसून त्याला या राज्यकर्त्यांनी भिकारी केले आहे. आत्ताच्या शेतकरी नेत्यांचा बेगडीपणा असून शेतकरी नेते राजकारणी झाले आहेत. स्वर्गीय शरद जोशी सोडले तर या देशात शेतकऱ्यांची बाजू मांडणारा कोणीही नेता जन्माला आलेला नसल्याची खंत चिंचोरे यांनी व्यक्त केली.

शेतमालाला कवडीमोल दर मिळत असताना राज्य सरकार आपले सरकार वाचविण्याच्या नादात शेतकरी वर्गाला विसरल्याचे युवा शेतकरी संजय सोनवणे यांनी या आंदोलनात आपली भूमिका मांडताना सांगितले. पिक विम्याच्या नावाने कोट्यवधी रुपये विमा कंपनीना जातात मात्र शेतकऱ्यांच्या हातात काही एक पडत नाही हे सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांचे सरकार आहोत मग यांनी शेतकऱ्यांसाठी केले तरी काय ?असा सवाल सोनवणे यांनी विचारत हे आंदोलन यापुढेही तीव्र करण्याची गरज असल्याचे बोलून दाखवले एकीकडे शेतकरी जेसीबीने आपला कांदा उकिरड्यावर फेकत आहे तर दुसरीकडे स्वतःच्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून शेतीची नांगरटी करीत असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.

या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ बोरसे, शेतकरी गोविंदा सुलक्षण आदींनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे व शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी केली. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे बाजार समितीचे संचालक शेतकरी नेते संजय सोनवणे यांनी आक्रमक भूमिका मांडत सरकार कोणाचीही असो कुठल्याही पक्षाची असो आपल्याला त्याच्याशी घेणे देणे नाही मात्र शेतकरी हा मदतीपासून वंचित राहिला नाही पाहिजे त्याला त्याच्या शेतमालाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे. यासाठी लोकप्रतिनिधींना सुद्धा जाब विचारण्याची वेळ आली तरी चालेल मात्र शेतकऱ्यांसाठी केव्हाही आणि कुठेही आंदोलन करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

शेतकरी प्रतिनिधी म्हणाले की, शेतकरी एकजूट राहिला तरच शासनालाही गांभीर्य कळेल अन्यथा शेतकऱ्याला कोणी वाली नसल्याचे सांगत येत्या शुक्रवार पर्यन्त शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर प्रसंगी बागलाण तहसील समोर बहुसंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात येईल यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने लढा देण्याची वेळ असल्याचे संजय सोनवणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.

यावेळी सरपंच, उपसरपंच सोसायटी सभापती,उपसभापती, परीसरातील ग्रामपंचायत सदस्य, संचालक,आदींसह बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकाकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सटाणा पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राऊत ,पोलीस हवालदार जयंतसिंग सोळंकी, अजय महाजन ,अशोक चौरे,निवृत्ती भोये, धनंजय बैरागी, सोनवणे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता..

आंदोलनातील महत्त्वाचे
*आंदोलनात शेतकऱ्यांनी कवडीमोल दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटो व कांदे रस्त्यावर ओतून शासनाचा केला निषेध*
*आंदोलन सुरू असताना राज्यमार्ग 19 वर वाहतुक कोंडी; वाहनांच्या दुतर्फा लाईन लागल्याने काही काळ वाहतूक कोंडी मात्र वाहनधारक ही शेतकरी पुत्र असल्याने ते ही झाले आंदोलनात सहभागी*.

*महसूल प्रशासनाला या आंदोलनाची पूर्वकल्पना दिलेली असताना महसूलचा कुठलाही अधिकारी अथवा कर्मचारी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी आंदोलन ठिकाणी न आल्याने शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाचा केला निषेध*
*आंदोलनात शेतकऱ्यांची मागणी असलेल्या निवेदन हे पोलीस प्रशासनाकडे देण्यात आले*

*गारपीटग्रस्त बागलाणला गत एक ते दीड महिन्यापासून तहसीलदार नसल्याने शेतकऱ्यांनी कैफियत कोणाकडे मांडायची असा सवाल उपस्थित काही शेतकऱ्यांनी आंदोलन स्थळी विचारला*

Farmer Agitation Satana Taluka CM Visit


Previous Post

मनमाड बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदी यांची झाली बिनविरोध निवड

Next Post

भर कार्यक्रमात गौरी खानचा आर्यन खानबद्दल मोठा खुलासा

Next Post

भर कार्यक्रमात गौरी खानचा आर्यन खानबद्दल मोठा खुलासा

ताज्या बातम्या

मंदिराच्या आवारात घेतला किस; ‘आदिपुरुष’फेम क्रिती सेनॉन आणि ओम राऊत ट्रोल

June 9, 2023
प्रातिनिधीक फोटो

विद्यार्थ्यांनो, इकडे लक्ष द्या! MHT CET परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

June 9, 2023
सुनिता धनगर

अखेर शिक्षण विभागाला जाग लाचखोर सुनीता धनगर हिच्यावर केली ही कारवाई

June 9, 2023

ना मंत्री, ना लवाजमा.. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न… अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कन्येचा विवाह… हा आहे त्यांचा जावई

June 9, 2023

‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेने मागितली माफी… हे आहे प्रकरण

June 9, 2023

उर्फी जावेद करणार या आजोबांचा महिन्याचा खर्च; कोण आहेत ते?

June 9, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group