पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती, माजी आमदार डॉ. देवीसिंह शेखावत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “डॉ. देवीसिंह शेखावत हे उत्तम जनसंपर्क असलेले एक लोकप्रिय नेते होते. अमरावतीचे पहिले महापौर तसेच विधान मंडळाचे सदस्य या नात्याने त्यांनी चांगले काम केले होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. दिवंगत डॉ. देवीसिंह शेखावत यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व श्रीमती प्रतिभाताई पाटील व त्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त करतो”, असे राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटले आहे.
त्यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. माजी महापौर आणि आमदार शेखावत यांचे वय ८९ होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते सदस्य होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ६ वाजता येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Ex MLA and Mayor Devisingh Shekhawat Death