India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

इन्फ्लूएंझावर औषध नाही; पण, अशी घ्या काळजी

India Darpan by India Darpan
March 18, 2023
in राज्य
0

 

लवकर तपासणी…
निदान….
उपचार….
इन्फ्लूएंझाला करू हद्दपार

मागील महिनाभरापासून सर्वत्र इन्फ्लूएंझाचा संसर्ग वाढत आहे. सर्दी, ताप, खोकला यासारख्या लक्षणांनी नागरिक त्रस्त आहेत. इन्फ्लूएंझा हा विषाणूमुळे होणारा आजार असून, याची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, घ्यावयाची काळजी याची माहिती देणारा लेख…

उपप्रकार – इन्फ्लूएंझा टाईप ए चे एच 1 एन 1, एच 2 एन 2, एच 3- एन 2 हे उपप्रकार आहेत.
इन्फ्लुएंझा (फ्लू) ची लक्षणे – ताप, खोकला, घसादुखी, घशात खवखव, धाप लागणे, अंगदुखी, डोकेदुखी, नाक गळणे, इतर कोणतेही निदान झालेले नसणे.

इन्फ्लूएंझा टाळण्यासाठी काय करावे?
हे करा –

वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावेत, पौष्टिक आहार घ्यावा, लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करावा.
पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी, भरपूर पाणी प्यावे,

हे करू नका –
हस्तांदोलन, धुम्रपान, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका, आपल्याला फ्लू सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका,

इन्फ्लूएंझा रुग्णांसाठी घ्यावयाची काळजी
रुग्णाकरिता वेगळी खोली निश्चित करावी. रुग्णाने स्वतः नाकावर रुमाल बांधावा. रुग्णाने धुम्रपान करू नये. रुग्णाने भरपूर विश्रांती घ्यावी आणि द्रव पदार्थ घ्यावेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. दिवसातून किमान दोनवेळा गरम पाण्यात मीठ हळद टाकून गुळण्या कराव्यात, तसेच गरम पाण्याची वाफ घ्यावी.

रुग्णाने घरात जर कोणी अति जोखमीचे आजार असणारे असतील तर त्यांच्या निकट सहवासात जाऊ नये. घरात ब्लीच द्रावण तयार करावे. याचा उपयोग रुग्णाचा टेबल, खुर्ची, रुग्णाचा स्पर्श होतील असे पृष्ठभाग पुसण्यासाठी करावा.

रुग्णाने शक्यतो बैठकीच्या खोलीत, ज्या ठिकाणी सर्व कुटुंबीय असतील तेथे येणे टाळावे.
रुग्णाने वापरलेले रुमाल गरम पाण्यात, ब्लीच द्रावणात अर्धा तास भिजवून नंतर स्वच्छ धुवावेत.

रुग्णाचे अंथरूण – पांघरूण, टॉवेल हाताळल्यास हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत.
ताप आणि फ्ल्यूची इतर लक्षणे संपल्यानंतर किमान २४ तासापर्यंत घरी रहावे.

रुग्णाने वापरलेले टिश्यू पेपर अथवा मास्क कुठेही टाकू नयेत.
रुग्णाची सेवा शक्यतो कुटुंबातील एकाच व्यक्तिने करावी.

नागरिकांनी घाबरून न जाता जागरूक राहणे गरजेचे आहे. लवकर तपासणी जीवन वाचवते. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

हंगामी ताप (SEASONAL FLU)
याशिवाय हंगामी ताप (SEASONAL FLU) या आजाराचेही प्रमाण वाढत आहे. हंगामी ताप हा एक संसर्गजन्य आजार आहे, जो गंभीर असू शकतो. त्यामुळे खूप उशीर होण्यापूर्वी काळजी घेणे गरजेचे आहे.
हंगामी ताप व्यक्ती ते व्यक्ती, खोकणे आणि शिंकणे यातून श्वासाद्वारे, हात आणि पृष्ठभागावर पडलेले थेंब याद्वारे पसरतो.

या लोकांना अधिक धोका –
गर्भवती महिला, लहान बाळ, ज्येष्ठ नागरिक, रोगप्रतिकारक क्षमतेची कमतरता असलेल्या व्यक्ती, वैद्यकीय आणि सर्जिकल आजार असलेल्या व्यक्ती, दीर्घकालीन औषधे घेणारे रूग्ण.

लक्षणे –
ताप, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी, धाप लागणे ही लक्षणे दिसू लागताच ४८ तासांच्या आत तपासणी करून घ्यावी. लवकर तपासणी जीवन वाचवते.

प्रतिबंधात्मक उपाय –
शिंकताना आणि खोकताना नाक आणि तोंड झाकावे, आपले हात नियमितपणे साबण आणि पाण्याने धुवावेत, आपले डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळावे, सतर्क रहावे, विलगीकरणात रहावे, भरपूर द्रव प्यावे, स्वतःहून औषध घेणे टाळावे, टिश्यू पेपरचा पुनर्वापर टाळावा, हस्तांदोलन करणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे

Enfluenza Flu Virus Infection H3N2 Precaution


Previous Post

धक्कादायक! डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी परस्पर बँकेत उघडले खाते… तब्बल ६ कोटींचा घोटाळा… असे झाले उघड

Next Post

यंदा जगभरात तृणधान्य वर्ष का साजरे केले जात आहे? घ्या जाणून सविस्तर

Next Post

यंदा जगभरात तृणधान्य वर्ष का साजरे केले जात आहे? घ्या जाणून सविस्तर

ताज्या बातम्या

दोन मजली बिल्डींग चक्क उचलून नऊ फूट मागे सरकवली; कसं काय? पुण्यातील अनोख्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा (व्हिडिओ)

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

बँकेत पैसे भरण्यासाठी रांगेत उभे असतांना वृध्द महिलेची पर्स उघडून चोरट्यांनी एक लाख रुपये केले लंपास

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण करणा-याला पोलिसांनी केले गजाआड

March 22, 2023

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्यावतीने नाशकात स्वागत यात्रा, मिरवणूक

March 22, 2023

राजधानीत गुढीपाडवा साजरा; सिन्नर तालुक्यातील बाल वारकऱ्यांच्या अभंगातून सारेच थक्क

March 22, 2023

हज यात्रेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group