India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

खडसे यांच्या अडचणी वाढणार; या प्रकरणात एसआयटीची स्थापना

India Darpan by India Darpan
March 1, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुक्ताईनगर येथील सातोड प्रकरणात नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशीचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून देण्यात आले होते. त्यानंतर आता नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या अडचणीत वाढणार आहे.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आमदार एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावे असणार्‍या ३३ हेक्टर ४१ आर जमीनीवरून उत्खनन करून ४०० कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. तर या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

४०० कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप
आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मुक्ताईनगर तालुक्यातल्या सातोड शिवारातील ३३ हेक्टर ४१ आर जमीनीतून करण्यात आलेल्या उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला होते. यावेळी ते म्हणाले होते की, मंदाताई खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर जमीनीची खरेदी करण्यात आली. या जमीनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना म्हणजेच एनए प्रदान करण्यात आली. जानेवारी २०१९ मध्ये आधीच एनए झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला. आणि काही दिवसांमध्येच प्रांताधिकार्‍यांनी याला तात्काळ शेतीसाठी परवानगी दिली. यामुळे महसूल खात्याच्या आशिर्वादाने शालेय प्रयोजनासाठी असलेल्या या शेतीला पुन्हा कृषक करण्यात आले. यानंतर याच ठिकाणावरून अवैध गौणखनिज उत्खनन करण्यात आले. खरं तर येथे १० हजार ब्रासच्या उत्खननाची परवानगी होती. मात्र येथून लाखो ब्रास मुरूमासह अन्य गौणखनिजाचे उत्खनन करण्यात आले. या माध्यमातून येथून तब्बल ४०० कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केला होता.


Previous Post

ठाकरे गटाच्या शिवगर्जना आणि शिवसंवाद अभियानाला शिवधनुष्य यात्रेने उत्तर

Next Post

LIVE : महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन तिसरा दिवस; बघा, थेट प्रक्षेपण

Next Post

LIVE : महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन तिसरा दिवस; बघा, थेट प्रक्षेपण

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group