मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येत्या सहा महिन्यांत ई पासपोर्ट जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात चिप आधारित ई-पासपोर्ट जारी करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार ई पासपोर्ट विषयावरील कामाला गती आली आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, “संपूर्ण जग चिप आधारित ई-पासपोर्टकडे वाटचाल करत आहे आणि भारतालाही या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे. त्यामुळे या संदर्भात प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ४.५ कोटी चिप्ससाठी आशयपत्र जारी करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत करार झाल्यानंतर सहा महिन्यांत ई-पासपोर्ट जारी करण्याची प्रक्रिया सुरू करू शकू.” पुढे ते म्हणाले, ई-पासपोर्ट जारी करण्याचा उद्देश प्रवास सुलभ, जलद आणि डेटाची सुरक्षा सुनिश्चित करणे आहे. विशिष्ट प्रक्रियेद्वारे ही आवश्यक माहिती चिपमध्ये टाकली जाते आणि विशेष प्रिंटरने प्रिंट केली जाते. वेगवेगळ्या अनेक टप्प्यात ही प्रक्रिया करावी लागणार आहे.
नाशिकमध्ये असलेल्या सिक्युरीटी प्रेसमध्ये या पासपोर्टची निर्मिती सुरू आहे. सध्या या पासपोर्टची नमुना चाचणी सुरू आहे. पासपोर्टच्या सुरक्षेविषयी अधिक सजग कसे राहता येईल, याबाब काम सूरू आहे. डेटा चोरीच्या धोक्यांबद्दल खूप सावधपणे विचार केला जात आहे. त्यामुळे पासपोर्ट नमुना चाचणी प्रक्रियेतून जात आहे. माहिती चोरी होण्याचा धोका नाही हे जोपर्यंत स्पष्ट होणार नाही तोपर्यंत ही प्रक्रिया पुढे जाणार नाही हे स्वाभाविक आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, ई-पासपोर्टमध्ये स्मार्ट कार्ड तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन’ (RFID) चिप बसवली आहे. चिपची वैशिष्ट्ये इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन (ICAO), संयुक्त राष्ट्रांची एक विशेष एजन्सी, ई-पासपोर्टसह आंतरराष्ट्रीय प्रवास दस्तऐवजांसाठी मानके परिभाषित करते. त्यामध्ये कागद आणि चिप दोन्हीची माहिती असेल