मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांची तब्ब्येत आणखी खालावल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोविड न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करुन उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर उपचारांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. परिणामी, त्यांनी कोरोनावर मात केली. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. गेल्या २८ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांचे वय ९३ वर्षे आहे. आता पुन्हा त्यांची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी देशभरात प्रार्थना केल्या जात आहेत.