India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे आणखी एक मोठे विधान; बघा, काय म्हणाले ते….

India Darpan by India Darpan
February 16, 2023
in Short News
0

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपमुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच पहाटेच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट करीत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यापाठोपाठ पुण्यात पत्रकारांनी विचारणा केली असता मी तुर्त अर्धेच बोललो आहे. योग्य वेळी उरलेलंही सांगेन, या शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना पुन्हा एकदा लक्ष्य केले.

देवेंद्र फडणवीस यांच्या गोप्यस्फोटावरील चर्चा अद्याप सुरूच असताना त्यांनी दुसरा बॉम्बगोळा टाकला आहे. मी बोललो, ते सत्यच असल्याचे ते म्हणाले. त्याचे वेगवेगळे अर्थ तुम्ही लोकांनी काढले. पण, मी काय-काय बोललो? ते तुम्ही शांतपणे बसून ऐका म्हणजे तुम्हाला त्याची प्रत्येक कडी जोडता येईल. त्यावेळच्या माझ्या पत्रकार परिषदा बघा, त्यावेळी मी काय-काय बोललो आहे, तेही बघा. त्या सर्व गोष्टी तुम्ही बघितल्या तर तुम्हाला दुसर्‍या पुराव्याचीदेखील गरज पडणार नाही. पण मी अजून अर्धच बोललो आहे. उरलेल जे काही अर्धे आहे, ते दुसरी योग्य वेळ आल्यानंतर उर्वरित अर्धदेखील बोलेल, असे विधान देवेंद्र फडणवीस म्हणाले.

चर्चांना उधाण
देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. फडणवीस आणखी काय बोलणार? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मोर्चेबांधणीसाठी फडणवीस बुधवारी पुण्यात आले होते. यादरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिले. त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते व खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर अनेकांच्या भेटीगाठीही घेतल्या.

मी जे बोललो ते 100% सत्य बोललो आहे. याच्यापेक्षा जास्त मला बोलायचे आहे. योग्य वेळी बोलेन…#Pune pic.twitter.com/V0oczwAGt8

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 15, 2023

DYCM Devendra Fadnavis Big Statement on Morning Swearing Ceremony
Politics


Previous Post

मंगलकार्यालयाच्या आवारातील लोखंडी गेटसह पाईप चोरीला

Next Post

दुचाकीस्वार तरूणीची वाट अडवित रिक्षाचालकाने केला विनयभंग, गुन्हा दाखल

Next Post

दुचाकीस्वार तरूणीची वाट अडवित रिक्षाचालकाने केला विनयभंग, गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

मालेगावमध्ये पोलिस शिपाई एसीबीच्या जाळ्यात; यासाठी मागितले ४ हजार

June 6, 2023

अमृता फडणवीस पुन्हा एकदा ट्रोल; आता हे आहे कारण…

June 6, 2023

आज विरोधक सक्रीय होतील; जाणून घ्या बुधवार, ७ जून २०२३चे राशिभविष्य

June 6, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – ७ जून २०२३

June 6, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – लायब्ररी

June 6, 2023

अतिखोल अरबी समुद्रातील अति तीव्र चक्रीवादळ… महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

June 6, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group