India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

येवल्यातील या दोन प्रश्नांवर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केल्या या महत्त्वाच्या घोषणा

India Darpan by India Darpan
December 27, 2022
in स्थानिक बातम्या
0

महापुरूषांचे पुतळे लावण्यासाठी रीतसर परवानगी बंधनकारक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – “राज्यातील कोणत्याही गावात किंवा शहरात राष्ट्रपुरूष किंवा थोर व्यक्ती यांचे पुतळे उभारण्यास रीतसर पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. राजापूर, ता. येवला येथील गावातील चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन केल्याबद्दल गुन्हे दाखल केल्याबाबत सदस्य नरेंद्र दराडे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले, “कोणत्याही शहरात किंवा गावात थोर महापुरूषांचे पुतळे स्थापन करण्यास मनाई नाही. मात्र पुतळा बसविण्यासाठी रीतसर पूर्व परवानगी घ्यावी लागते. याबाबत शासनाने पुतळा बसविण्याविषयी कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्वे विहित केली आहेत. राजापूर-ममदापूर चौफुली येथे ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये काही व्यक्तींनी परवानगी न घेता आणि विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा स्थापन केला होता. यामुळे या तरूणांवर आदेशाचा भंग केल्याने गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला होता.

लोकप्रतिनिधी अवमान प्रकरणी पोलिसांना पाठिशी घालणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
येवला मर्चंट बँक निवडणुकीसाठी नियमानुसार पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला होता. निवडणूक प्रक्रियेदरम्यान काही लोकप्रतिनिधींना पोलीस अधिकाऱ्यांकडून धक्काबुक्की केली असेल किंवा हीन वागणूक दिली असेल तर खपवून घेतली जाणार नाही, अशा पोलीस अधिकाऱ्याला पाठिशी घालणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. येवला मर्चंट बँक निवडणुकीत पोलीस निरीक्षकांनी पॅनल प्रमुखांना धक्काबुक्की, शिवीगाळ, मारहाण केल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य किशोर दराडे यांनी मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोलिसांनी विधानपरिषद सदस्य यांना आणि कार्यकर्त्यांना मतदान झाले असेल बाहेर थांबण्यास सांगितले होते. यावेळी वाद निर्माण होऊन धक्काबुक्की झाली होती याबाबत विधानपरिषद सदस्यांनी पोलीस निरीक्षक श्री. मथुरे यांच्याविरूद्ध पोलीस महासंचालक आणि नाशिकचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांच्यामार्फत वस्तुनिष्ठ चौकशी करण्यात येत आहे. चौकशीला अडथळा येऊ नये, यासाठी त्या पोलीस अधिकाऱ्याची दुसरीकडे बदली करण्यात येईल.

Misbehaviour by Govt official towards any public representative will not be tolerated.
नाशिक: कोणत्याही लोकप्रतिनिधीला चुकीची वागणूक मिळाली असेल, तर ते सहन केले जाणार नाही.
चौकशीचे आदेश दिले आहेत.
7 दिवसात चौकशी पूर्ण करून कारवाई करण्यात येईल.
(विधानपरिषद । दि. 27 डिसेंबर 2022) pic.twitter.com/pvREPbM8ul

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 27, 2022

DYCM Devendra Fadanvis on Yeola two Questions
Nashik Maharashtra Winter Assembly Session Nagpur


Previous Post

या व्यक्तींनी आज शब्द जपून बोलावे; जाणून घ्या, बुधवार, २८ डिसेंबरचे राशिभविष्य

Next Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – हा योगसाधनेचा एक भाग

Next Post

इंडिया दर्पण - विचार पुष्प - हा योगसाधनेचा एक भाग

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group