चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी घेतले रेणुका देवीचे दर्शन घेतले. सकाळी त्या चांदवड येथील रेणुका मातेच्या दर्शनाला आल्या होत्या. देवीची पूजा व आरती केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी अधिवेशनात तुम्हाला काय अपेक्षित आहे असे विचारले असता त्यांनी माझी अपेक्षा मी आधीच पूर्ण करून घेल्याचे सांगितले. नागपूर अधिवेशनात जे ठराव होतात ते पूर्ण झाले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. विधानसभा व विधान परिषदेत एकजुटीने सीमावासीयांबरोबर आहोत हा ठराव मांडला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.