दिंडोरी: नगरपंचायत निवडणूकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. दरम्यान निवडणूक प्रक्रिया, अर्ज दाखल करणेबाबत त्यासाठी आवश्यक कागदपत्र दाखले तसेच आदर्श आचारसंहिता याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी निलेश श्रींगी यांनी राजकीय पक्ष व नागरिकांची बैठक घेत मार्गदर्शन केले तसेच सायबर कॅफे चालक यांचीही बैठक घेत त्यांना ऑनलाईन निवडणूक अर्ज भरण्याचे प्रक्रियेची माहिती दिली.यावेळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी नागेश येवले उपस्थित होते.सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन श्रींगी यांनी केले.दिंडोरी नगरपंचायत चे १७ प्रभागांसाठी २३ मतदान केंद्र असणार आहेत.
कागदपत्र जमवाजमवी साठी इच्छुकांची धावपळ
नगरपंचायत निवडणूकीसाठी अर्ज भरण्यासाठी कमी वेळ मिळणार असल्याने कागदपत्र जमवाजमव करण्यासाठी इचुकांची धावपळ सुरू असून शासकीय कर भरणा करत दाखले मिळविण्यासाठी इच्छुकांनी नगरपंचायत कार्यालयात गर्दी केली होती.
राजकीय व्यूहरचना सुरू
निवडणूक जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्वच राजकीय पक्षांचे नेते राजकीय व्यूहरचना आखत आहे.
शिवसेना ,काँग्रेस ,राष्ट्रवादी, भाजप ने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे मनसे ही काही जागा लढवणार आहे.स्वबळा सोबतच आघाडीच्या चर्चाही सुरू आहे.