दिंडोरी- दिंडोरी तालुक्यातील वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाच कोटी रुपये विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नाने मंजुर झाल्याची माहिती वरखेडा येथील उपसरपंच राजेंद्र उफाडे यांनी दिली.
वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राला सुसज्ज इमारत नसल्याने रुग्णांचे तसेच आरोग्य कर्मचा-यांचे हाल होत होते. अनेक वेळा रुग्णांना नाशिकला पाठवून द्यावे लागत होते. औषधोपचारासाठी ही रुग्णांना त्रास सहन करावा लागत होता. आरोग्य कर्मचा-यांचे अनेक प्रश्न होते त्यामुळे राजेंद्र उफाडे यांनी वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन प्रस्तावा मांडला व त्यांचा पाठपुरवा सुरु केला. विधानसभा उपाध्यक्ष यांचे विशेष सहकार्य लाभले या इमारतीला पाच कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती वरखेडा येथील उपसरपंच राजेंद्र उफाडे यांनी दिली. नुतन इमारतीमध्ये ५ ऑक्सीजन बेड व वेंनटेलेंटरची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. सुसज्ज बेड,स्वच्छताग्रह तसेच औषधपचार विभाग,शस्त्रक्रिया विभाग,महिला विभाग व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना साथीच्या काळात अडचणींना सामोरे जावे लागले ती गरज ओळखून या इमारतीत कोरोना उपचार कक्ष, विलगीकरण कक्ष उभारण्यात येणार आहे. गरीब रुग्णांना कोरोना उपचार केंद्राचा फायदा होणार आहे. तसेच उपचाराचा महागडा खर्च वाचणार आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा उपयोग वरखेडा , कोंबडवाडी, आंबेवणी, परमोरी,घोडेवाडी, करजी ,राजापूर, लोखंडेवाडी, मातेरेवाडी, कादवा कारखाना,लखमापूर, करंजवण, ओझरखेड, म्हेळूस्के , कादवा माळूगी,अवनखेड, दहेगाव , वागळूद आदी गावाना होणार आहे.