दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक – दिंडोरी रस्त्यावर सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची गाडी आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली. नाशिकहून वणी गडावर जात असताना वनारवाडी फाट्याजवळ कार मधून धूर येत असल्याने गाडी मालकाने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवत गाडीचे बोनट उघडले असता त्यातून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागला. त्यानंतर काही क्षणात गाडीने पेट घेतला. सुदैवाने गाडीत बसलेले सर्वजण बाहेर पडलेले असल्याने मोठा अनर्थ टळला. परिसरातील लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तो फोल ठरला आणि गाडी पूर्णपणे जळून खाक झाली.