शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धुळे जिल्ह्यात आमदार निधीबाबत झाला हा मोठा निर्णय

by India Darpan
ऑक्टोबर 29, 2022 | 12:12 pm
in स्थानिक बातम्या
0
dhule 1140x570 1 e1667025702373

धुळे ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) : जिल्हा वार्षिक योजनेत राज्य शासनाने धुळे जिल्ह्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या विनियोगाचे कालबद्ध नियोजन करीत जिल्ह्यातील मूलभूत सेवा-सुविधांचे बळकटीकरण करावे. उपलब्ध निधी मार्च 2023 अखेर शंभर टक्के खर्च होईल, असे नियोजन करताना कामांचा दर्जा उत्कृष्ट राहील याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात आज दुपारी जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री श्री. महाजन हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. अश्विनी पवार, खासदार डॉ. हिनाताई गावित, जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, महानगरपालिका आयुक्त देवीदास टेकाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, उपवनसंरक्षक नितीन सिंग, परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी सत्यम गांधी, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले, जिल्हा वार्षिक योजना 2022- 23 करीता सर्वसाधारण योजनेत 236 कोटी रुपये, आदिवासी उपयोजनेत 118 कोटी रुपये, तर अनुसूचित जाती उपयोजनेत 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी 67 कोटी रुपयांचा निधी सर्वसाधारण योजनेत प्राप्त झाला आहे. आदिवासी उपययोजनेत 34 कोटी रुपये, तर अनुसूचित जाती उपयोजनेत 4 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर कार्यान्वयीन यंत्रणांनी तांत्रिकी मंजुरी घेवून प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने प्रस्ताव सादर करावेत. विकास कामांचे प्रस्ताव सादर करताना पायाभूत सुविधांवर भर देण्यात यावा, त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत नियमितपणे आढावा घ्यावा. जनावरांवरील लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला निधी उपलब्ध करून दिला आहे. पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना करीत जनावरांवरील लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेले बंधारे संबंधित विभागांनी तातडीने दुरुस्त करावेत, प्रत्येक विभागाने कामांचा दर्जा उतकृष्ट ठेवावा. अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्यात. तसेच प्रत्येक तालुक्यात आमदार निधीतून एक शववाहिका देण्याचा प्रस्ताव असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत खासदार डॉ. हिना गावित, आमदार किशोर दराडे, आमदार जयकुमार रावल, आमदार काशिराम पावरा, आमदार मंजुळाताई गावित, आमदार डॉ. फारुक शहा आदींनी भाग घेतला. त्यांनी कमी पाऊस झालेल्या भागात पिण्याच्या पाण्याचे आतापासूनच नियोजन करावे, दुष्काळाचे लाभ मिळावेत, तापी काठावरील 17 गावांचे पुनर्वसन मार्गी लावावे, काबऱ्या खडक प्रकल्पाची दुरुस्ती करावी, अनेर अभयारण्य घोषित होण्यापूर्वी वसविलेल्या वाड्या पाड्यांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, धुळे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, वीज वितरण कंपनीच्या कामांसाठी निधी मिळावा, शाळांना वीज उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले, सर्वसाधारण योजनेत आतापर्यंत 6 कोटी 40 लाख रुपये किमतीच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता दिली असून 4 कोटी पाच लाख रुपयांचा निधी वितरीत केला आहे. उर्वरित निधी विहित कालावधीत खर्चाचे नियोजन केले असून याबाबत वेळोवेळी कार्यान्वयीन यंत्रणांचा आढावा घेण्यात येत आहेत. जिल्हा वार्षिक योजनेत (सर्वसाधारण) सन 2021- 22 करीता शासनाने 210 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मार्च 2022 अखेर 209 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. खर्चाची टक्केवारी 99.90टक्के आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती हटकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे प्रमुख, शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चैत्राम पवार यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
ग्रामविकासात उत्कृष्ट कार्य केल्यामुळे बारीपाडा येथील चैत्राम पवार यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री. पवार यांच्या कार्याचे जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांनी वाचन केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ठरणार

Next Post

छटपुजेवेळी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; ३० हून अधिक गंभीर जखमी

Next Post
gas spot

छटपुजेवेळी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; ३० हून अधिक गंभीर जखमी

ताज्या बातम्या

Screenshot 20250517 144809 WhatsApp

छगन भुजबळ यांच्या मोबाईलवर फोन करून १ कोटीची खंडणी उकळण्याचा प्रयत्न….पोलिसांच्या पथकाने मुसक्या आवळल्या

मे 17, 2025
INDIA GOVERMENT

ऑपरेशन सिंदूर….खासदारांच्या या ७ टीम जगाला माहिती देणार..

मे 17, 2025
cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011