धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – साक्री पंचायत समितीमधील कंत्राटी अभियंता वैभव हिम्मत हालोरे ७ हजार ५०० रुपयाची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या सापळ्यात अडकला. पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले असून तक्रार यांचे घरकुलाचे झालेल्या बांधकामाचे फोटो काढून नजरी मूल्यांकन करून घरकुलाचा पुढील धनादेश मिळून देण्याच्या मोबदल्यात ही लाच त्याने तक्रारदाराकडून मागितली. पण, तक्रारदाराने लाच लुचपत विभागाशी संपर्क केल्यानंतर हा सापळा रचण्यात आला. त्यात हालोरे सापडला. धुळे येथील लाच लुचपत विभागाने ही कारवाई केली.
Dhule ACB Raid Anti Corruption Engineer Trap