देवळा : देवळा नाशिक रस्त्यावर चार चाकी ईर्टीका व मोटार सायकल यांच्यात आज सांयकाळी झालेल्या भिषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील रामेश्वर येथील रहिवाशी गोपीनाथ साळूबा हिरे हे आपल्या कुटुंबासह पिंपळगाव (वा.) येथून शेतीचे काम आटोपून रामेश्वर येथे जात असतांना दुर्गा हॉटेल जवळ नाशिक कडून देवळ्याकडे येत असलेल्या चार चाकी इर्टीका (क्रमांक एम.एच. ४३ ए.एल. ३००९) ने गोपिनाथ यांच्या मोटार सायकल (क्रमांक एम.एच. ४१ के. ५६६१) यांच्यात झालेल्या भिषण अपघातात गोपीनाथ साळूबा हिरे (वय ४२), यांच्यासह पत्नी मंगलाबाई गोपीनाथ हिरे (३५), मुलगा गोरख गोपीनाथ हिरे (१६) हे जागीच ठार झाले. तर मुलगी जागृती ( १८ ) ही उपचारादरम्यान मयत झाली. देवळा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल कृरण्याचे काम चालू होते. एकाच कुटुंबातील चौघांच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.