नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्ली महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पूर्व महापालिका निवडणुकीत आज एक हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. आम आदमी पार्टी (आप) चे माजी नगरसेवक हसीब-उल-हसन यांना यंदाच्या निवडणुकीत पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आले आहे. त्यामुळे हसन यांनी शास्त्री पार्क मेट्रो स्टेशनसमोरील हाय टेन्शन वायर टॉवरवर चढून या प्रकाराचा निषेध केला. पक्षाची धोरण चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आगामी दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हसन यांना तिकीट नाकारण्यात आले. एका हाय-टेन्शन वायर टॉवरवर चढून आत्महत्येची धमकी हसन यांनी दिली. त्यामुळे ही बाब विशेष चर्चेची ठरली आहे. माजी नगरसेवकाला टॉवरवर चढलेले पाहून टॉवरखाली मोठ्या संख्येने जमाव उपस्थित झाला. पोलिसही तेथे पोहचले. त्यांना खाली उतरविण्यासाठी आणि त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दिल्ली महापालिका निवडणुकीत आपने १३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. १३४ उमेदवारांच्या यादीत ७० महिलांना तिकीट देण्यात आले आहे, तर माजी आमदार विजेंदर गर्ग यांना नारायणा येथून ‘आप’ने उमेदवारी दिली आहे. काँग्रेसमधून ‘आप’मध्ये आलेले दिल्लीचे ज्येष्ठ नगरसेवक मुकेश गोयल यांना आदर्श नगर प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. तिमारपूरमधील मलकागंजमधून काँग्रेसच्या माजी नगरसेवक गुड्डी देवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शनिवार, ४ डिसेंबर रोजी दिल्ली महानगरपालिकेची (एमसीडी) निवडणूक होत आहे. आम आदमी पक्षाने ११७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत आपले नाव नसल्यानेच हसन यांनी टॉवरवर चढून गांधीगिरी केली आहे. बघा, त्याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/TheMornStandard/status/1591705433450098690?s=20&t=NEGH_apsYkz7Uc5D24dgbg
Delhi Municipal Corporation Election Ex Corporator Stunt