गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

…म्हणून भडकला अभिनेता कुशल बद्रिके

by India Darpan
नोव्हेंबर 13, 2022 | 3:24 pm
in मनोरंजन
0
Kushal Badrike

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘चला हवा येऊ द्या’ फेम कुशल बद्रिके म्हणजे आपला लाडका कुश्या. आपल्या कामाने तो सगळ्यांनाच चांगला परिचयाचा आहे. कुशल आज यशाच्या शिखरावर आहे, तो कायम चर्चेत असतो. वेगवेगळ्या भूमिका साकारत, परिस्थितीशी दोन हात करत त्याने कायम सर्व प्रेक्षकांना खिळवून ठेवत हसवण्याचे काम केले आहे. असे असले तरी या हॅप्पी गो लकी आणि मोकळ्या स्वभावाच्या कुशलचा एका गोष्टीमुळे पारा चढला आहे. कुशलच्या सोशल मीडियाच्या पोस्टचा आधार घेत एका वेबसाईटने वेगळीच बातमी दिल्याने त्याने संताप व्यक्त केला आहे.

झालं असं की, दोन दिवसांपूर्वी लंडनला जात असताना कुशल बद्रिकेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. त्यात कुशल सांगतो, मी एकट्याने कधीच सिनेमा पाहिलेला नाही, मध्यंतरात समोसा आणि पॉपकॉर्न शेअर करण्यात सिनेमापेक्षा जास्त मज्जा आहे अस मला नेहमी वाटतं. एवढंच काय तर एकटाच असा हॉटेलमध्ये जाऊन मी कधी जेवलेलो पण नाही, मला काय ऑर्डर करावं हेच सुचत नाही. अगदी असंच एकट्याने प्रवास करायला मला आवडत नाही. कदाचित मी स्वतःची कंपनी फार एन्जॉय करत नसेन. पण आज सिनेमाच्या शूटींगसाठी एकटं लंडनला जावं लागतय. इंटरनॅशनल प्रवासात, पृथ्वीचा व्यास ओलांडताना घड्याळाचा तासही बदलतो या गोष्टीचं मला आजही अप्रूप वाटत. खिडकीतून दिसणारे ढग, ढगांच्या चाळणीतून दिसणारा समुद्र, त्यातून डोकावणारा सूर्यप्रकाश. अवेळी रात्र या सगळ्यात कुणीतरी गप्पा मारणार हवं यार.पण आयुष्याच्या प्रवासात शेवटापर्यंत आपल्याला साथ करणारे फक्त आपणच असतो, काही लोक हाथ सोडवून घेतात तर काहींचे हाथ आपल्या हातून अलगद सुटतात, शेवटचा प्रवास मात्र एकट्यानेच करावा लागतो. मग एखादा विमान प्रवास एकट्याने करायला काय हरकत आहे, असा विचार मनात येतो. पण तरीही वाटतं…. किमान आंतरराष्ट्रीय प्रवासामधे आपल्या वाट्याचे 2-पेग प्यायला तरी कुणी हवं होतं….हॅप्पी जर्नी टू मी”, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

त्याची ही पोस्ट व्हायरल झाली होती. मात्र या पोस्टवर एका वेबसाईटने ‘शेवटचा प्रवास मात्र एकट्यानेच… अभिनेता कुशल बद्रिकेच्या पोस्टने उडाली एकच खळबळ’, अशी बातमी चालवली. कुशलने ही बातमी वाचताच त्याबद्दल राग व्यक्त केला आहे. यावर आपली प्रतिक्रिया म्हणून त्याने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तो म्हणतो, माझ्या पोस्टवरून अशी बातमी करणारा माणूस कमाल आहे. असा माणूस सुखाने झोपू कसा शकतो, असा प्रश्नही त्याने विचारला आहे. देव यांना सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थना केली आहे.

Actor Kushal Badrike Angry for this Reason
Entertainment Marathi TV

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हायव्होल्टेज ड्रामा! निवडणुकीत तिकीट दिले नाही म्हणून माजी नगरसेवक चढला थेट वीजेच्या टॉवरवर (व्हिडिओ)

Next Post

१ कोटी रुपये रोख… ६० तोळे सोने….. लाचखोर तहसिलदाराकडे सापडले मोठे घबाड

India Darpan

Next Post
FhS7gktUUAcuzkH

१ कोटी रुपये रोख... ६० तोळे सोने..... लाचखोर तहसिलदाराकडे सापडले मोठे घबाड

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011