India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

दूध भेसळीवरुन सभागृहातील वातावरण तापले…. भेसळखोरांना थेट फाशी देण्याची आग्रही मागणी (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
March 17, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात दूध भेसळीची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. दूध भेसळीचे मोठे सामाज्र पसरले आहे. दूध भेसळीचा प्रश्न गंभीर असून लहानग्या कच्च्या-बच्च्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. दूध भेसळ करुन सामान्य जनतेच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांना फाशी देण्याची तरतूद करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

दरम्यान दुधाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त दूध उत्पादनाच्या काळात सहकारी संस्थांना पावडर करुन एक्सपोर्ट करण्याची परवानगी देण्याची मागणीही अजित पवार यांनी केली.

राज्यात दूधाच्या उत्पादनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. येत्या काही काळात राज्यात एक कोटी लीटरपर्यंत दूधाचे कलेक्शन जाण्याची शक्यता आहे. मात्र दूध व्यवसायात काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. दूध भेसळ करणाऱ्यांचे मोठे सामाज्र पसरले आहे. राज्यात दूध भेसळीची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. दूध भेसळ करुन लहानग्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे.

दूध भेसळीमुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. आघाडी सरकारच्या काळात दूध भेसळ करताना सापडल्यास त्याला फाशीची शिक्षा करण्याची तरतूद करण्याचा कायदा प्रस्तावित होता. मात्र राष्ट्रपती महोदयांनी या कायद्याला परवानगी दिली नाही, त्यामुळे हा कायदा झाला नाही. मात्र दूध भेसळ ही अत्यंत गंभीर समस्या असून दूध भेसळ करणाऱ्याला फाशीची तरतूद करण्याची मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली.

राज्यात दूधाच्या उत्पादनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. येत्या काही काळात राज्यात एक कोटी लीटरपर्यंत दूधाचे कलेक्शन जाण्याची शक्यता आहे. मात्र दूध व्यवसायात काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. दूध भेसळ करणाऱ्यांचं मोठं सामाज्र पसरलं आहे. ही बाब गंभीर आहे.#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३ pic.twitter.com/4Oyf3fUS1x

— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 17, 2023


Previous Post

शेतकरी नुकसान भरपाईसाठी आमदार आक्रमक… विधिमंडळ पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी (व्हिडिओ)

Next Post

शेतातून गहू काढण्याचे मशीन नेले… शेतकऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी… नंतर तुफान हाणामारी… अखेर एका शेतकऱ्याची हत्या

Next Post
प्रातिनिधीक फोटो

शेतातून गहू काढण्याचे मशीन नेले... शेतकऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी... नंतर तुफान हाणामारी... अखेर एका शेतकऱ्याची हत्या

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023

पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न

March 24, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर

March 24, 2023
प्रातिनिधीक फोटो

इन्फ्लूएंझा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर

March 24, 2023

गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी; तब्बल ७० लाखांना गंडा

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group