नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने जळगावच्या पारोळा नजीक कारवाई करीत बनावट दारु कारखाना उध्वस्त केला आहे. या कारवाईत तब्बल दीड कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून २५ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या २५ पैकी १७ जणांना या पथकाने ताब्यात घेतले आहे तर सात जण फरार झाले आहे. जप्त केलेला सगळा मुद्देमाल मालेगाव येथील राज्य उत्पादन विभागाच्या कार्यालयात ठेवण्यात आला आहे.एवढया मोठ्या प्रमाणावर बनावट दारुचा कारखाना सुरु असतांना त्याकडे कोणाच लक्ष का दिले नाही या बद्दल अनेक शंका उपस्थित होत आहे.