बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तब्बल २२ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग; डांगसौंदाणे जनता विद्यालयात रंगला माजी विद्यार्थी मेळावा

शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले स्नेहसंमेलन

by Gautam Sancheti
मे 23, 2022 | 1:41 pm
in इतर
0
IMG 20220523 WA0005

 

 निलेश गौतम, डांगसौंदाणे (सटाणा)
येथील जनता विद्यालयात तब्बल 22 वर्षांनी इयता 10वी च्या वर्गाचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. 1999-2000 च्या तुकडीचा हा स्नेहमेळावा शाळेच्या इतिहासातील पहिलाच मेळावा ठरल्याने गाव व पंचक्रोशत हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. तब्बल 22 वर्षांनी तत्कालीन वर्ग मित्र व मैत्रिणी एकत्र आल्या तर तत्कालीन सर्व शिक्षक या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

65 माजी विद्यार्थी आणि 18 शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नव्या-जुन्या आठवणींसह एक स्तुत्य उपक्रम ठरला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य पी डी पाटील हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून तत्कालीन प्राचार्य आर एम शिवदे, जी एन.बोरसे, जी व्ही आहेर, एस ए पगार, बी एच पवार, आर के भामरे, एच टी पगार, एस वाय कापडणीस, आर.व्ही आहेर, आर एम मोरे , जे बी ठाणगे, सतीश भरती काका सुलक्षण, बाळुसिंग परदेशी हे होते.

सकाळी 10 वाजता सुरुवात झालेल्या या स्नेहमेळाव्याची सांगता दुपारी 4 वाजता झाली. यावेळी अनेक जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. शिक्षक व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी आपले मनोगत व्यक्त केल्याने उपस्थित सर्व मागच्या 22 वर्ष जुन्या इतिहासात गेल्याने तत्कालीन शिक्षक विद्यार्थी मध्ये एक उत्साह पुर्वक वातावरण निर्मिती झाली होती. स्नेहमेळाव्याला तत्कालीन हजेरी पुस्तकाप्रमाणे 88 विद्यार्थी, विद्यार्थिनी मधून तब्बल 65 विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित राहिल्याने ही उपस्थिती लक्षणीय ठरली.

या कार्यक्रमात पुणे, बडोदा, जळगाव, सिंधुदुर्ग, रायगड व अन्य ठिकाणी नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमास सचिन आहिरे, जयंत आहिरे, राकेश सोनवणे, संदीप बधान, सफल सोनवणे, तुषार देशमुख, प्रदीप सोनवणे, दीपक सोनवणे ,जीवन बैरागी, सचिन सोनवणे, रतीलाल गांगुर्डे, शरद गायकवाड, नाना देशमुख, सोमनाथ साबळे, दीपक पवार,सुदाम बैरागी समाधान व्यवहारे, दिनेश सोनवणे,शांताराम गायकवाड, आत्माराम सोनवणे, नंदन देशमुख,सोमनाथ बागुल गोपाल ह्याळींज, प्रमिला वाघ, दर्शना पगारे, जोत्स्ना सोनवणे, कविता बिरारी, दिपीका नाहिरे, मंगला सोनवणे, रंजना सोनवणे, धनश्री बैरागी, संगीता काकुळते, पूनम वाघ, रत्ना निकम, सुरेखा वाघ,जयश्री सोनवणे, आदी विद्यार्थी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रसातविक निलेश गौतम यांनी केले तर सुत्रसंचलन दीपक जगताप व पल्लवी सोनवणे यांनी केले

कार्यक्रमातील प्रमुख विशेष
– तत्कालीन वर्ग मित्र बाबूलाल जगताप हा अपंग विद्यार्थी गरीब असल्याने त्याला सर्व वर्गमित्रांनी ड्रेस भेट देत त्याच्याबद्दल असलेली मित्रत्वाची भावना जोपासली.
– आलेल्या सर्व माहेरवाशीण असलेल्या तत्कालीन वर्ग मैत्रणींना गावाची व शाळेची आठवण म्हणुन निलेश गौतम यांनी वयक्तिक रित्या समई भेट देत आदरभाव व्यक्त केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोदींच्या परदेश दौऱ्याची ही आहे खासियत; वेळेची अशी करतात बचत

Next Post

धक्कादायक! संतप्त जावयाचे सासू, पत्नी आणि मुलीवर विळ्याने वार; सासूचा मृत्यू

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
प्रातिनिधिक फोटो

धक्कादायक! संतप्त जावयाचे सासू, पत्नी आणि मुलीवर विळ्याने वार; सासूचा मृत्यू

ताज्या बातम्या

DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011