शनिवार, ऑक्टोबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गर्लफ्रेंडची हौस भागावी म्हणून त्याने केला हा उद्योग; व्हॉटसअॅप स्टेटसने असा झाला भांडाफोड

सप्टेंबर 4, 2022 | 2:06 pm
in क्राईम डायरी
0
crime diary 2

ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रेमात पडलेले प्रेमवीर एकमेकांसाठी कधी काय करतील याचा नेम नाही. प्रियकर व प्रेयसी एकमेकांसाठी विविध आणा भाका घेतात, तसेच वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतात. विशेषतः प्रियकर आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी, तिची हौस पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याचे धाडस करतो. असाच एक प्रकार अंबरनाथमध्ये उजेडात आला आहे. प्रियकराने आपल्या प्रियसीला इम्प्रेस करण्यासाठी चक्क दुकानात चोरी केली. आणि हा सर्व प्रकार अतिशय रंजकरित्या समोर आला आहे.

अंबरनाथ पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, गर्लफ्रेंडला आयफोन आणि स्कूटर घेऊन देण्यासाठी प्रियकर आग्रही होता. अखेर त्याने एक शक्कल लढविली. तो ज्या दुकानात पूर्वी काम करत होता तेथेच त्याने चोरी करण्याचा प्लॅन आखला. मात्र या चोरट्याने ठेवलेल्या व्हॉट्सऍप स्टेटसमुळे त्याच्या मालकाला संशय आला आणि पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला बेड्या ठोकल्या. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

अंबरनाथ पश्चिमेला रेल्वे स्टेशनजवळ सुनील महाडिक यांचं ओम श्री साईराम अगरबत्ती भांडार हे अगरबत्ती आणि पूजा साहित्याचं दुकान आहे. त्याच या दुकानात राज आंबवले हा तरुण कामाला होता. मात्र तो आर्थिक अफरातफर करत असल्याचं लक्षात आल्यानं महाडिक यांनी त्याला कामावरून काढून टाकलं होतं. महाडिक यांनी सप्लायरला देण्यासाठी अडीच लाखांची रोकड घरून आणली होती. मात्र सप्लायर न आल्यानं ही रोकड ड्रॉव्हरमध्ये ठेवून ते घरी गेले.

दुसऱ्या दिवशी ते दुकानात आले असता त्यांच्या दुकानाची ग्रील कापलेली आणि कुलूप तोडलेले आढळून आले. तर ड्रॉव्हर चावीने उघडून त्यातले दोन लाख रुपये आणि एक सोन्याची चेन चोरून नेल्याचं त्यांना आढळले. त्यामुळे महाडिक यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

दरम्यान, काही दिवसांनी महाडिक यांच्याकडे पूर्वी काम करणाऱ्या राज आंबवले याने त्याच्या व्हॉट्सऍप स्टेटसवर गर्लफ्रेंडला नवीन आयफोन आणि नवीन ऍक्टिव्हा स्कुटर फोटो टाकले. ते पाहून सुनील महाडिक यांना संशय आला. कारण महाडिक यांचा पैशाचा ड्रॉव्हर चावीने उघडून चोरी झाली होती. आणि ते ड्रॉव्हरची चावी कुठे ठेवायचे, हे फक्त राज आंबवले यालाच माहीत होते. त्यामुळे महाडिक यांनी पोलिसांकडे याबाबतचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी राज याला उचलून आणत त्याला पोलिसी खाक्या दाखविला अखेर राज याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. कामावरून काढल्याचा जुना राग आणि गर्लफ्रेंडला फोन, स्कुटर घेऊन द्यायची असल्याने आपणच ही चोरी केल्याची कबुली त्याने दिली. त्यामुळे त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Crime WhatsApp Status Theft Girl Friend Will
Ambernath Boy Friend Police Arrest Shop

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्टेट बँकेची आता व्हॉट्सॲपवर मिळणार ही सेवा; ग्राहकांना मोठा दिलासा

Next Post

मविप्रच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवारांची सदिच्छा भेट; कर्ज फेडण्यासाठी या नेत्यांनी जाहीर केली दीड कोटीची देणगी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा धनत्रयोदशीचा दिवस… जाणून घ्या, शनिवार, १८ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 17, 2025
dhantrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे धनत्रयोदशी (धनतेरस) – अशी करा पुजा

ऑक्टोबर 17, 2025
dhanatrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीला या वस्तू चुकूनही खरेदी करू नका

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
IMG 20220904 WA0030 e1662284127871

मविप्रच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवारांची सदिच्छा भेट; कर्ज फेडण्यासाठी या नेत्यांनी जाहीर केली दीड कोटीची देणगी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011