गुरूवार, नोव्हेंबर 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पुण्यात शालेय मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न; पालकांमध्ये चिंता

सप्टेंबर 24, 2022 | 1:52 pm
in संमिश्र वार्ता
0
crime 6

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसात अपहरणाच्या अनेक घटना समोर येत आहेत. पुण्यातील येवलेवाडी येथील एका शाळेतील तीन शाळकरी मुलींचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला आहे. कोंढवा परिसरातील येवलेवाडी गावात सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या मुलींच्या हुशारीमुळे एकीचेही अपहरण झाले नसून तिन्ही मुली सुखरुप आहेत. याबाबत मुलींनी शाळेत आणि घरी सांगितल्यानंतर मुख्याध्यापकांनी पोलिसात तक्रार केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास येवलेवाडी परिसरातील एका शाळेमध्ये जाण्यासाठी शाळेची विद्यार्थिनी घरातून पायी निघाली होती. काही अंतर चालल्यावर रस्त्याच्या कडेला एका व्हॅनजवळील व्यक्तीने तिला आडवले आणि तुझी आई आजारी असून दवाखान्यात नेले आहे तुला तिकडेच नेण्यासाठी आम्हाला पाठवले आहे, असे मुलीला सांगितले. मात्र मुलीने सांगितले आत्ताच आईने मला शाळेत पाठवले आहे. त्यामुळे मी तुमच्यासोबत येणार नाही आणि मुलीने तेथून काढता पाय घेत पळत जवळ असलेली शाळा गाठली. त्या मुलीच्या पाठोपाठ येणाऱ्या आणखी दोन मुलींनाही हाच अनुभव आला. त्यातील एका मुलीला तर गाडीत बस म्हणून त्यांनी दमदाटीही केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र मुलींनी पळ काढून शाळा गाठली. ही घटना मुलींनी शिक्षक आणि मुख्याध्यापकांना सांगितली त्यानंतर शिक्षकांनी शाळेच्या रस्त्यावर व परिसरात व्हॅनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र व्हॅन दिसली नाही. त्यानंतर मुख्याध्यापकांनी ही बाब पोलिसामध्ये तक्रार दाखल केली.

अपहरण केल्याची अफवा
कोंढवामध्ये हे प्रकरण घडत असताना याच परिसरात असलेल्या लुल्ला नगर परिसरातील आणखी एका शाळेतील दोन मुलींची अपहरण घडले असल्याची बातमी आज कोंढवा परिसरात वाऱ्यासारखी पसरत होती. याबाबत पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या की “संबधित शाळेत जाऊन आम्ही मुख्याध्यापकांना भेटलो. त्यांनी सर्व मुलींची मोजणी करून आम्हाला दाखवली. शिवाय एकाही पालकांकडून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. त्यामुळे या परिसरात मुले पळविणारी टोळी दाखल झाल्याच्या बातम्या केवळ अफवा आहेत.

जुना व्हिडिओ
मुलांची विक्री केली गेल्याचे व्हिडीओ हा सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेरचा जुना व्हिडीओ आहे व त्यामध्ये बरेच एडिटींग केले आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि असे व्हिडीओ दुसऱ्यांना पाठवू नये”, असे आवाहन पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी केले आहे.

Crime Three Children’s Kidnapping Attempt Police
Pune Yevalewadi
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या  दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कर्मचाऱ्यांना बोनस दिला आणि परतही मागितला! या कंपनीच्या कारभाराची सर्वत्र जोरदार चर्चा

Next Post

खाद्य तेलाबाबत एफडीए आक्रमक; सणासुदीत होणार कठोर कारवाई

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

खाद्य तेलाबाबत एफडीए आक्रमक; सणासुदीत होणार कठोर कारवाई

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011