India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शिक्षकाने तब्बल ४० विद्यार्थ्यांना केली मारहाण; अखेर गुन्हा दाखल…

India Darpan by India Darpan
September 28, 2022
in राज्य
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात कोणत्याही शाळेत शिकवताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कोठल्याही प्रकारे शारीरिक शिक्षा करू नये, असे केंद्र आणि राज्य शासनाच्या शिक्षण विभागाचे शिक्षण संस्थांना आदेश आहेत. तरीही विद्यार्थ्यांना मारहाण करण्याच्या घटना घडतातच. बीड जिल्ह्यातील परळी येथे देखील असाच एक भयानक प्रकार घडला किरकोळ कारणावरून एका मारकुट्या शिक्षकाने आठवीच्या वर्गातील सुमारे ४० विद्यार्थ्यांना छडीने बेदम मारहाण केली. यात एका विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली असून या शिक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्वीच्या काळी शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून छडीने बेदम मारहाण करीत असत, परंतु त्याबद्दल पालक कधीही तक्रार करण्यासाठी पुढे येत नसत, कारण तेव्हा ‘छडी लागे छम छम, विद्या येई घमघम.. ‘ असा विचार त्यामागे होता. परंतु आता काळ बदलला आहे. मुलांना मारहाण करणे चूकीचे आहे, कारण मुले ही देवाघरची फुले असतात. किंबहुना आजच्या काळातील पिढी ही नाजूक आणि संवेदनाशील झाली आहेत, त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांना शारीरिक मारहाण करू नये, असा शिक्षण विभागाचा फतवा आहे. त्यामुळे अनेक शिक्षकही कोणत्याही विद्यार्थ्यांच्या अंगाला सहसा हात लावीत नाहीत, परंतु काही अविचारी शिक्षक कसलाही विचार न करता विद्यार्थ्यांना मारहाण करतात.

परळी शहरात वडसवित्रीनगरमध्ये असलेल्या मराठवाडा ऊसतोड कामगार मंडळ, परळी संचलित श्री. नागनाथ निवासी विद्यालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. कोणत्या शाळेत शिक्षक वर्गाला आल्यावर विद्यार्थी मराठीत ‘ एक साथ नमस्ते ‘ किंवा इंग्रजीमध्ये ‘गुड मॉर्निंग’ म्हणण्याची साधारणतः आपल्याकडे प्रथा आहे. त्याप्रमाणे या शाळेतील शिक्षक बालाजी लक्ष्मण फड आठवीच्या वर्गात गेले. सर्व ४० विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात गुड मॉर्निंग असे शिक्षकांना उद्देशून म्हटले, परंतु त्याऐवजी व्हेरी गुड मॉर्निंग असे म्हणायला हवे होते, तसेच तुमचा आवाज मवाळ नसून उद्धट होता, असे म्हणत या शिक्षकाने चक्क विद्यार्थ्यांना छडीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली, त्यामुळे विद्यार्थी रडतडत वर्गाबाहेर पडले, इतकेच नव्हे तर एका विद्यार्थ्याच्या बोटाला जोरात छडी लागून जखम होऊन त्यातून रक्त वाहू लागले.

या शिक्षकाच्या शिक्षेचा हा भयानक प्रकार विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांना सांगितला. तेव्हा मुख्याध्यापकांनी तसेच अन्य शिक्षक यांनी त्या मारकुट्या शिक्षकाला समज देण्याचा प्रयत्न केला, मात्र शाळेचे इतर शिक्षक या शिक्षकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर काही पालकांना हा प्रकार कळाल्यावर सर्वांनी परळीचे पोलीस स्टेशन गाठले. आता या शिक्षकावर तक्रार दिल्यानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

या सर्व संतप्त पालकांनी गैरप्रकाराबाबत शाळेच्या व्यवस्थापनाला विचारणा केली असता या शिक्षकावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. तसेच या मारहाणीत एका विद्यार्थ्याचे बोट फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याच्यावर आंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहेत. संबंधित शिक्षकाने यापूर्वीही असेच विद्यार्थ्यांना मारहाण तसेच अर्वाच्य भाषेत बोलण्याची घटना घडली होती. फड यांना सांगूनही त्यांच्या गैरवर्तनात काही बदल झाला नव्हता. त्यामुळे शालेय प्रशासन, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी त्रस्त आहेत.

Crime Teacher Beaten 40 School Students FIR
Beed Parali


Previous Post

ऑनलाईन सेलमध्ये ऑर्डर केला लॅपटॉप… प्रत्यक्षात मिळाले कपड्याचे साबण… पुढं काय झालं

Next Post

पांढरे शुभ्र कपडे आणि काळा कोट घालायचे आणि रेल्वे प्रवाशांना लुबाडायचे; असे झाले उघड

Next Post
प्रातिनिधिक फोटो

पांढरे शुभ्र कपडे आणि काळा कोट घालायचे आणि रेल्वे प्रवाशांना लुबाडायचे; असे झाले उघड

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group