India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पांढरे शुभ्र कपडे आणि काळा कोट घालायचे आणि रेल्वे प्रवाशांना लुबाडायचे; असे झाले उघड

India Darpan by India Darpan
September 28, 2022
in राज्य
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणत्याही रेल्वेमध्ये प्रवास करताना टीसी कडून तिकीट तपासणी होते. कोणी विना तिकीट प्रवास करत असेल तर दंड वसूल करण्यात येतो, परंतु दोन भामटयांनी आपण टीसी असल्याची बतावणी करीत मुंबई, ठाणे, कल्याण भागात रेल्वेत प्रवाशांची लुबाडणूक सुरू केली होती, मात्र रेल्वे अधिकारी, काही प्रवासी आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा गैरप्रकार उघडकीस आला असून या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अशीच आणखी काही टोळी सक्रिय आहे का? याचा देखील शोध घेण्यात येत आहे.

देशभरात कोठेही रेल्वेने प्रवास करताना तिकीट काढणे आवश्यक असते. सध्याच्या काळात ऑनलाईन पद्धतीने तिकीट मिळत असून काही ठिकाणी रेल्वे स्टेशनवर देखील तिकीट विक्री सुरू आहे. परंतु काही जण विना तिकीट प्रवास करतात, त्यासाठी धावत्या रेल्वेमध्ये टीसी तथा तिकीट तपासणी अधिकारी सर्वांचेच तिकीट तपासतो आणि विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून दंड वसूल करतो. परंतु आजच्या काळात काहीतरी कष्ट न करता गैरमार्गाने किंवा शॉर्टकट पद्धतीने पैसे कमवायचे किंवा उकळण्याची प्रथा सुरु झाली आहे. असाच एक गैरप्रकार मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात दोन तरुण करत होते.

हे दोन तोतये चक्क टिसी बनून त्यांनी प्रवाशांची लुबाडणूक सुरू केली होती. त्यासाठी टिसीप्रमाणे अंगात काळा कोट व पांढरा शर्ट, तसेच हातात टीसी असल्याचे खोटे पावती बूक घेऊन दोन टीसी प्रवाशांची तिकीट तपासणी करत होते. मात्र त्याची संशयास्पद हालचाल पाहून रेल्वेतील अधिकृत टीसी आणि त्यांच्या सहकऱ्याला शंका आली. तेव्हा हे भामटे रेल्वे स्टेशनवरुन वावरत असताना त्यांना पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

रोहिदास गायकवाड व संदीप पवार अशी अटक आरोपींची नाव असून कसारा रेल्वे स्थानकात हे दोघे फलाटावरील रेल्वे प्रवाशांचे तिकीट तपासत होते. यावेळेला ड्युटीवर असलेल्या रेल्वे कर्मचारी व टीसी संतोष त्रिपाठी व विष्णू सांबरे यांनी या दोघांना हटकले. त्याचवेळी ते टाळाटाळ करत होते, मात्र नंतर दोघांनी बनावट ओळखपत्र दाखवून ते रेल्वेमध्ये टीसी व सरकारी नोकर असल्याची बतावणी करू लागले. मात्र त्यांच्या बोलण्यावरून संशय आल्याने त्यांनी रेल्वे प्रशासनाला कळवली. तात्काळ तेथे कल्याण लोहमार्ग पोलिसांनी पोहोचून रेल्वे विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, दोन भामट्यांकडे रेल्वेचे दोन बनावट ओळखपत्र व दोन मोबाईल फोन आढळून आले. त्यांची पोलिसांनी चौकशी केली असून त्यांच्यावर रेल्वे पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime Railway Passenger Loot two Arrested
Duplicate TC


Previous Post

शिक्षकाने तब्बल ४० विद्यार्थ्यांना केली मारहाण; अखेर गुन्हा दाखल…

Next Post

कावासाकीने लॉन्च केली ही जबरदस्त बाईक… किंमत आहे फक्त १६ लाख…. असे आहेत फिचर्स

Next Post

कावासाकीने लॉन्च केली ही जबरदस्त बाईक... किंमत आहे फक्त १६ लाख.... असे आहेत फिचर्स

ताज्या बातम्या

Good News! डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आता या सरकारी योजनेचा लाभ

February 1, 2023

फलटण-पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार देणार ९२१ कोटी रुपये

February 1, 2023
संग्रहित छायाचित्र

आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाबाबत झाले हे महत्त्वाचे निर्णय; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

February 1, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

बाल संगोपन परिपोषण अनुदानात भरीव वाढ; राज्यातील ५४ हजार लाभार्थ्यांना मिळणार एवढे पैसे

February 1, 2023

कोकणातील आंगणेवाडी यात्रेला जाणाऱ्यांना मोठा दिलासा; यंदा मिळणार या सर्व सुविधा

February 1, 2023

गाईसाठी ७० हजार रुपये… म्हशीसाठी ८० हजार रुपये… राज्य सरकारने केली खरेदी किंमतीत वाढ 

February 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group