गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘स्पेशल २६’ चित्रपटाप्रमाणेच घडला थरारक प्रकार; व्यापाऱ्याला ३५ लाखांना गंडवले

by India Darpan
फेब्रुवारी 9, 2022 | 5:03 am
in संमिश्र वार्ता
0
crime 123

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बहुतांश वेळा असे म्हटले जाते की, ‘समाजात घडणाऱ्या घडामोडींचे प्रतिबिंब सिनेमा किंवा चित्रपटात उमटते.’ त्याचप्रमाणे चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या नानाविध दृश्यांचा समाज मनावर देखील चांगला – वाईट परिणाम घडत असतो, असे समाजशास्त्रज्ञांचे मत आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘स्पेशल 26’ चित्रपट सिनेप्रेमींना नक्कीच आठवत असेल. अनेक व्यावसायिकांच्या घरावर सीबीआयच्या बनावट पथकाने छापा टाकला आणि त्यांच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळ काढला, असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. सध्या देखील बिहारमध्ये असाच एक प्रकार घडला आहे.

बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील एका वाळू व्यापाऱ्यासोबत खऱ्या आयुष्यातही अशीच एक घटना समोर आली आहे. फरक एवढाच आहे की, चित्रपटात बनावट सीबीआयची टीम होती. तर प्रत्यक्ष बिहारमध्ये बनावट इन्कम टॅक्स विभागाचे ऑफिसर म्हणून काही जण आले आणि 25 लाखांची रोकड आणि 10 लाखांचे दागिने घेऊन पळून गेले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयकर अधिकारी म्हणून आलेल्या काही बदमाशांनी वाळू व्यापारी संजय सिंह यांची 35 लाख रुपयांची फसवणूक केली. चारचाकी वाहनातून आलेल्या पाच पुरुष आणि दोन महिलांनी बनावट आयकर अधिकारी असल्याचे भासवून वाळू व्यावसायिक संजय सिंग यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लाखोंची रोकड आणि दागिने ताब्यत घेतले. या दरम्यान घरातील व्यक्तीने वाळू व्यावसायिक संजयला फोन केला असता ते घाईघाईत घरी पोहोचले. आयकर अधिकारी असल्याची बतावणी करत बदमाशांनी त्याला चालकासह वाहनात बसवले. यानंतर चोरट्यांनी संजयला घरात कोंडून मुख्य गेट बाहेरून बंद करून वाहनासह पळ काढला.

वाटेत चोरट्यांनी सांगितले की, आम्ही आयकर कार्यालयात जातोय, तिथे तुम्हाला चौकशीसाठी यावे लागेल. जेव्हा प्राप्तिकर कार्यालयात जाण्यासाठी संजय घरातून बाहेर पडू लागले तेव्हा गेट बाहेरून बंद होते. यानंतर घराचे गेट उघडून, ते आयकर कार्यालयात पोहोचल्यावर तेथून कोणतीही कारवाई झाली नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर संजय यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलीस ठाण्यात दिली. पोलीसांनी घरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील हालचालींचे रेकॉर्डिंग आपल्यासोबत नेले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोरट्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

सुमारे तीस ते चाळीस वर्षांपूर्वी भारतात हिंसाचाराच्या पार्श्वभूमी किंवा पटकथा असलेले चित्रपट मोठ्या प्रमाणावर प्रदर्षित होत होते, त्या काळात समाजात हिंसाचाराचे प्रमाण वाढले, असे मत त्या काळातील समाज कार्यकर्त्यांनी व्यक्त केले होते. त्यामुळे अशा चित्रपटांवर बंदी घालावी, अशी मागणी देखील होत होती. विशेष म्हणजे चित्रपटातील हिरो किंवा अभिनेता ज्याप्रमाणे अभिनय करतो, स्टाईल मारतो किंवा एखादी चांगली -वाईट कृती करतो, त्याप्रमाणेच समकालीन तरुणाई देखील तशी कृती करण्यास प्रवृत्त होते, असे दिसून येते. पुण्यामध्ये सुमारे पंचेचाळीस वर्षापूर्वी घडलेल्या एका खूनाच्या मालिकेची प्रेरणा गुन्हेगारांनी चित्रपटांमधून घेतली होती, असे त्याकाळी सांगण्यात येत असे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा असेल तुमचा आजचा दिवस; वाचा, बुधवारचे राशिभविष्य

Next Post

अनेक सुनावण्या झाल्या तरी माहिती न दिल्याने सुप्रीम कोर्टाने केंद्राला ठोठावला एवढा दंड

India Darpan

Next Post
SC2B1

अनेक सुनावण्या झाल्या तरी माहिती न दिल्याने सुप्रीम कोर्टाने केंद्राला ठोठावला एवढा दंड

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011