नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरात लहान मुलांच्या अपहरणाच्या अनेक घटना घडतात. काही वेळा पैशासाठी मुलांच्या अपहरण केले जाते. तर काही वेळा त्यांना वाईट मार्गाला लावून त्यांच्याकडून पैसे मिळवण्यासाठी असे कृत्य केले जाते. काही वेळा लहान मुलांना पोलीस ठेवले जाते. परंतु दिल्ली शहरात एक वेगळीच घटना घडली, किरकोळ चोरीच्या कारणावरून एका कुटुंबाने लहान बालिकाला ताब्यात ठेवून तिला चक्क गरम शाळेचे चटके दिले. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
दिल्ली शहरात देखील अशीच घटना घडली. देशाच्या राजधानीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. लोखंडी सळ्या चोरल्याच्या संशयावरून महिलेने १० वर्षाच्या चिमुरडीला ताब्यात ठेवून बेदम मारहाण केली आणि ओलीस ठेवल्यानंतर तिच्यावर गरम चिमट्याने चटके दिले. सध्या बालकाला डीडीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालक दिल्लीच्या उत्तमनगर येथील राज बिहार येथे कुटुंबासह राहतो. आई-वडील थोड्याच अंतरावर असलेल्या एक्सपोर्ट कंपनीत काम करतात. रात्री ९.३० वाजता त्यांच्या मुलाला एका महिलेने ओलिस ठेवल्याचे कुटुंबियांना समजले. यानंतर कुटुंबीय अंजू (आरोपी महिला) च्या घरी पोहोचले. मूल वेदनेने ओरडत असल्याचे पाहिले. ज्याला डीडीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे मुलावर उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे मुलाच्या शरीरावर २० हून अधिक जखमेच्या खुणा आढळून आल्या आहेत. नातेवाईकांच्या तक्रारीवरून उत्तम नगर पोलिसांनी आरोपी महिला अंजू हिला मारहाण आणि ओलीस ठेवण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपी महिला अंजूने सांगितले की, मुलगा घराबाहेर खेळत होता. यादरम्यान त्याने तेथून काही सळ्या उचलल्या. मुलाने सळ्या चोरल्याचा संशय तिला आला. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करून त्याच्या अंगावर गरम चिमट्याने चटके दिले. या अमानुष कृत्याबद्दल सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
Crime Small Girl Child beaten hot