नाशिक – पाचव्या मजल्यावरून पडल्याने २३ वर्षीय परप्रांतीय कामगार महिलेचा मृत्यु झाला आहे. नुतन इमारतीच्या बांधकामावर काम करीत असतांना ही घटना पाथर्डी वडनेर मार्गावर घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सुवाली राकेश चव्हाण (मुळ रा.मध्यप्रदेश हल्ली पाथर्डीगाव) असे मृत कामगार महिलेचे नाव आहे. चव्हाण ही महिला बुधवारी पाथर्डी वडनेर मार्गावरील दर्गा शेजारी सुरू असलेल्या नंदणवन या बांधकाम साईटवर काम करीत असतांना ही दुर्घटना घडली. ठेकेदार संदीप पंडीत यांच्या माध्यमातून दुपारच्या सुमारात ती पाचव्या मजल्यावर काम करीत असतांना अचानक जमिनीवर कोसळली. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने रोशन सुराणा यांनी तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले. डॉ.राम पाटील यांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषीत केले. अधिक तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत.