नाशिक – जितेंद्र इव्हीटेक शोरुममधून ७० हजार रुपये किंमतीच्या दोन इलेक्ट्रिक दुचाकी चोरीला गेल्याची घटना पाथर्डी परिसरात घडली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या शोरुममधून २० हजार रुपये किंमतीची सफेद रंगाची जेईटी २५० दुचाकी व ५० हजार रुपये किंमतीची सफेद रंगाची जेएमपी क्लासिक या दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेल्या. आतापर्यंत वाहन चोरीच्या घटना घडत होत्या. पण, थेट शोरुममधून चोरट्यांनी नवीन गाड्या चोरुन नेल्या आहे. शोएब सत्तार शेख यांनी या चोरीची तक्रार केली असून अंबड पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या चोरीचा हवालदार चव्हाण हे तपास करत आहेत.