नाशिक – विवाहाचे आमीष दाखवून प्रेमसंबध ठेऊन त्यानंतर जातीचे कारण दाखवून विवाहाला नकार दिल्यावरुन दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात किरण भिवाजी गाडे (वय ३०,) रेखा भिवाजी गाडे (वय ४५, नाशिक रोड मूळ गाव वाशीम) संशयिता विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी संशयितांनी ११ मे ३१ डिसेंबर दरम्यान संशयिताने पीडितेशी प्रेमसंबध ठेउन त्यानंतर ती अनुसुचित जातीची आहे एवढ्या कारणामुळे तिच्याशी विवाह करण्यास नकार देत शिवीगाळ करीत मारहाणीची धमकी देत फसवणूक प्रकरणी ॲट्रोसिटीर्तंगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.