नाशिक : भरधाव मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात दिंडोरीरोडवरील वाढणे फार्म परिसरात झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात वाहनासह पसार झालेल्या ट्रकचालकाविरूध्द अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मयुर गजानन बोरसे (२८ रा.शांतीनगर,मखमलाबाद) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मयुर बोरसे रविवारी (दि.१२) रात्री आापल्या युनिकॉर्न (एमएच १५ एचबी ७८०१)या दुचाकीवर दिंडोरीच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. वाढणे फार्म परिसरात कांद्याच्या गोणी भरलेल्या भरधाव मालट्रकने (एमएच १४ व्ही ४४८४) दुचाकीस धडक दिली. दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर झालेल्या या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मयुर बोरसे या दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला. अपघातानंतर ट्रक टालक आपल्या वाहनासह पसार झाला असून याप्रकरणी शिवा बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपघाताची नोद करण्यात आली आहे.अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आहिरे करीत आहेत.