नाशिक : बनावट दस्तऐवज दाखवून मिळकत विक्री करून ती विकसीत करण्याच्या बहाणाने परिचीत भामट्यांनी एकास लाखोंना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपील कन्हेय्यालाल केवलरमानी (३४) व कन्हैय्यालाल खियलदास केवलरमानी (५८ रा.दोघे.अम्रोलीया पार्क,कोरोनेशन हॉटेल मागे,लॅमरोड दे.कॅम्प)अशी गंडविणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी चंद्रकांत मगनलाल वेनसियानी (रा.जेलरोड) यांंनी तक्रार दाखल केली आहे. संशयीत आणि तक्रारदार एकमेकांचे परिचीत असून संशयीतांनी मौजे बलायदुरी ता.इगतपुरी येथील गट क्र.१६२,१४६,१५६,१७८ व अन्य गच नंबर मधील २००० चौरस फुट निवासी भूखंड हा १५ महिन्यांच्या आत मुदतीत बिनशेती करून देण्याची व त्यानंतर ३६ महिन्याच्या आत सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिल्याने ११ सप्टेंबर २०१३ रोजी वेनसियानी यांनी संबधीतांशी साडे आठ लाख रूपयांचा व्यवहार केला. यावेळी टोकन म्हणून ८० हजार रूपये रोख देण्यात आले. तसेच उर्वरीत रक्कम धनादेशाद्वारे अदा करण्यात आली. वारंवार चौकशी करूनही संबधीतांनी सदर प्रकल्पाची माहिती दिली नाही. तसेच सदर भूखंडाचे खरेदीखत करून न दिल्याने हा वाद पोलीसात पोहचला आहे. संबधीतांनी पैसे परत न केल्याने तक्रारदाराने तगादा लावला असता संबधीतांनी टाळाटाळ केली.एकूनच संबधीतानी बनावट दस्तऐवज दाखवून गंडविल्याचे समोर आल्याने तक्रारदाराने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खडके करीत आहेत.
….