रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – शहरात घरफोडीची मालिका सुरूच; पाच घरफोड्यांमध्ये सव्वा पाच लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

by India Darpan
नोव्हेंबर 17, 2021 | 3:27 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


नाशिक – शहरात घरफोडीची मालिका सुरूच; पाच घरफोड्यांमध्ये सव्वा पाच लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला
नाशिक : शहरात घरफोडीची मालिका सुरू असून नुकत्याच उघडकीस आलेल्या पाच घरफोड्यांमध्ये तब्बल सव्वा पाच लाख रूपये किमतीचा ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी आडगाव,सातपूर,इंदिरानगर आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यामध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नांदूरगावातील मिलींद दत्तात्रेय हिरगुडे (रा.मधुगिरी कॉलनी,मराठानगर) हे सोमवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास कामानिमित्त कुटूंबियांसह घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील ५० हजाराची रोकड चोरून नेली. दुसरी घटना आडगाव शिवारातील फायर ब्रिगेड निवासस्थान भागात घडली. याप्रकरणी आकाश मोतीराम कांबळे (रा.बिल्डींग नं.३, फायर ब्रिगेड निवासस्थान) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोमवारी (दि.१५) रात्री अज्ञात चोरट्यांनी कांबळे यांच्या इमारतीत राहणा-या व बाहेरगावी गेलेल्या प्रताप चव्हाण यांच्या घराचे कुलूप तोडून घरफोडी केली. यानंतर चोरट्यांनी पार्किंगमध्ये लावलेली कांबळे यांची सुमारे ५० हजार रूपये किमतीची एमएच १५ जीएस ८५५० ही दुचाकी पळवून नेली. दोन्ही घटनांप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास अनुक्रमे सहाय्यक निरीक्षक शिंदे व तोडकर करीत आहेत. तिसरी घटना शिंदे पळसे येथे घडली. भास्कर नथु कातकाडे (रा.साई विश्व अपा.जाधव संकुल पळसे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कातकाडे कुटूंबिय दि.१२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान बाहेर गावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातील रोकड व सोने चांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख १५ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक परदेशी करीत आहेत. चौथी घटना औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात घडली. किरणकुमार संपतराव साळवे (रा.जाधव संकुल,अशोकनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. साळवे कुटूंबिय दि.११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातील सोन्याचांदीचे दागिणे तसेच हॉलमधील टिव्ही आणि शिलाई मशीन असा सुमारे ६६ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत. तर पाथर्डी फाटा भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी १ लाख ३५ हजाराच्या रोकडवर चोरट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी किरण कैलास पुरकर (रा.आयकर कॉलनी,घनश्यामनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. पुरकर कुटूबिंय सोमवारी (दि.१५) बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील १ लाख ३५ हजाराची रोकड चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सय्यद करीत आहेत.

महिलेच्या गळयातील मंगळसूत्र लांबविले
नाशिक : शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना अशोकामार्ग भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरला प्रमोद पवार (रा.हरिसंकुल फेज ०२,नारायणनगर शेजारी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सरला पवार या सोमवारी (दि.१५) रात्री नेहमीप्रमाणे शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. अशोकामार्गावरील फोर्टीन एक्स जिम समोरून त्या पायी जात असतांना अचानक बोळीतून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळयातील सुमारे ३२ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रोंदळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – शहरात वेगवेगळया भागात राहणा-या तीघांची आत्महत्या

Next Post

अन्नपदार्थ आयातीसाठी देशात ७ सेंटर; नाशिकच्या ३ सेंटरलाही मान्यता

Next Post
FENreoGX0AEBjlB

अन्नपदार्थ आयातीसाठी देशात ७ सेंटर; नाशिकच्या ३ सेंटरलाही मान्यता

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

nia11

पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात एनआयएने ८ राज्यांमध्ये १५ ठिकाणी टाकले छापे

जून 1, 2025
crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011