नाशिक : शहरात आत्महत्येची मालिका सुरूच असून वेगवेगळया भागात राहणा-या तीघांनी नुकतीच आत्महत्या केली. त्यात एका ५४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तिघांच्या आत्महत्या कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी भद्रकाली,नाशिकरोड आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. जुने नाशिक येथील डिंगरआळीत राहणा-या विजया राजेंद्र पोकणे (५४ रा.देशमुख वाडा,संभाजी चौक) यांनी सोमवारी (दि.१५) आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक मगर करीत आहेत. दुसरी घटना शिंदेगावात घडली. सुरेश फकिरा विंचू (४५ रा. शिंदे ता.जि.नाशिक) यांनी मंगळवारी (दि.१६) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये पंख्याच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी सचिन साबळे यांनी खबर दिल्याने नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार उजागरे करीत आहेत. तर पेठरोडवरील मोटा अपार्टमेंट येथे राहणाºया जीवन दत्तू कासुदे (२२) या युवकाने मंगळवारी (दि.१६) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही घटना निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार जोशी करीत आहेत.