पतीच्या चौकशीच्या बहाण्याने विनयभंग, दोन जणांना अटक
नाशिक – पतीच्या चौकशीच्या बहाण्याने एकाने महिलेचा जेलरोडला शिवाजीनगर परिसरात महिलेच्या घरी जाऊन विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन नाशिक रोड पोलीसांनी दोघांना अटक केली आहे. मंगळवारी शिवाजीनगर परिसरातील माळी कॉलनीत एका बंगल्यात पीडित महिला घरी एकटीच असतांना रात्री दहाच्या सुमारास चेतन अनंत गायकवाड आणि सिलवेस्टर ॲथोनी दास या दोघा संशयितानी महिलेच्या घरी जाउन तिच्या पतीची चौकशी केली. पती कोठे आहे हे विचारण्याच्या बहाण्याने महिलेचा हात धरुन तिला शिवीगाळ केल्याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन दोघाविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
…..
जुन्या वादातून कोयत्याने वार
नाशिक – सिडकोतील चेतनानगर परिसरात जून्या वादातून मंगळवारी (ता.६) सायंकाळी पाचला दोघांनी जुन्या वादातून एकाला मारहाण केली. अजय दहीकर व त्याचा साथीदार अशी संशयितांची नावे आहेत पवन गणेशसिंग चंदेल (वय २४, चेतनानगर, चामुंडा क्लासीक) यांच्या तक्रारीनुसार अंबड पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, दोघा संशयितांनी जून्या वादातून लाकडी बॅट आणि कोयत्याने वार करण्यात आले.
…..
शहरात तीन दुचाकी व सायलन्सर चोरीला
नाशिक – मखमलाबाद परिसरातून शनिवारी (ता.३) चोरट्यांनी दुचाकी चोरुन नेली. याप्रकरणी विकी संजय पिंगळे (वय २८ पिंगळे गल्ली, मखमलाबाद) यांच्या तक्रारीवरुन म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी पिंगळे यांनी त्यांची लाल काळ्या रंगाची पल्सर दुचाकी (एमएच १५ जीएन ४७४२) त्यांच्या घरासमोर पार्क केली असता चोरट्यांनी हॅण्डल लॉक तोडून शनिवारी रात्रीतून केव्हातरी दुचाकी चोरुन नेली. दुसऱ्या घटनेत जयंत वसंतराव महाजन (वय ५८, सुजीवम सोसासटी पंडीत कॉलनी) यांची पांढऱ्या रंगाची ॲक्टीव्हा (एमएच १५ एफके ७३४९) ही त्यांच्या राहत्या घराच्या पार्कींगमधून चोरट्यांनी चोरुन नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरा गुन्हा मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. गुलाम दस्तगीर फारुख पटेल (वय २२, हरी आनंद सोसायटी, पखाल रोड, ) यांची होंडा कंपनीची ॲक्टीव्हा (एमएच १५ जीएम १५७७) त्यांनी शुक्रवारी (ता.२) सायंकाळी सातला गोल्फ क्लब मैदानाच्या मागच्या बाजूला पार्क केली असता, चोरट्यांनी हॅण्डल लॉक तोडून चोरुन नेली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलझाला आहे. दुचाकी चोरीचा चौथा प्रकार नाशिक रोडला चेहेडी शीव परिसरातील कोहकडे मळ्यात उघडकीस आला. अनिल बाळासाहेबगाडेकर (वय ३४, कोहकडे मळा, चेहेडी शीव ) यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी (ता.२) रात्री साडे दहाच्या सुमारास त्यांची मारुती सुझीकी इको फोर व्हीलर (एमएच १५ एचएम ५५७०) हीचे सायलन्सर चोरट्यांनी चोरुन नेले