तीन युवकांची आत्महत्या
नाशिक : शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात राहणा-या तिघांनी मंगळवारी (दि.६) आत्महत्या केल्या. आत्महत्या करणा-यांमध्ये तरूण युवकांचा समावेश असून त्यातील दोघांनी गळफास लावून घेत तर एकाने बिल्डींगच्या छतावरून उडी घेवून आत्महत्या केली. तिघा युवकांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड व सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
कांबळेवाडीतील रॉबिन भीमराव जाधव (२१) या युवकाने सोमवारी रात्री आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून लोखंडी पाईपाला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास खुटवड नगर येथील सुखकर्ता हॉस्पिटल येथे दाखल केले होते. मंगळवारी उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. याप्र्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत. दुसरी घटना कामटवाडे भागात घडली. चाणक्यनगर येथील जितेंद्र राजेंद्र वर्मा (१९ रा.मारूती मंदिराजवळ) या तरूणाने मंगळवारी आपल्या घराच्या गच्चीवरील शेडमध्ये लोखंडी अँगलला बेडशिट बांधून गळफास लावून घेतला होता. कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. जितेंद्रच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत. तर श्रमिकनगर येथील गंगासागर नगर येथील कपिल रमेश घोटकर (२५ रा.कडेपठार चौक) या युवकाने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या इमारतीवरू न उडी घेतली होती. या घटनेत तो गंभीर जखमी झाल्याने कुटूंबियांने त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.
….
ट्रकच्या धडकेत एक ठार
नाशिक : भरधाव मालट्रकने धडक दिल्याने रस्त्याच्या कडेला उभा असलेला ४३ वर्षीय इसम झाला. हा अपघात सुभाषरोड भागात झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश देवजीया नामदे (रा.भारतीमळा जवळ,सुभाषरोड) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. सुरेश नामदे मंगळवारी (दि.६) सुभाषरोडवरील सिंघानिया दुकानानजीकच्या पक्चर दुकानासमोर रस्त्याच्या कडेला उभे असतांना हा अपघात झाला. भरधाव आलेल्या एमएच १५ ईजी ४००२ या मालट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने भाऊ कैलास नामदे यांनी त्यांना तात्काळ गायकवाड मळा येथील ओम हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून पेनोसिया हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार भालेराव करीत आहेत.
….