दुकानदार महिलेचा विनयभंग
नाशिक : पार्किंगच्या वादातून एकाने दुकानदार महिलेस बलात्कार करण्याची धमकी देत विनयभंग केल्याची घटना पाथर्डीगावात घडली. या घटनेत संशयीताने महिलेच्या गाडीचे व मोबाईलचे नुकसान करीत तिच्या बहिणीसही मारहाण केली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक गव्हाणे (२८ रा.गौळाणेरोड) असे संशयीताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेचे दुकान असून सोमवारी (दि.५) सायंकाळच्या सुमारास पार्किंगच्या वादातून दुकानासमोर ही घटना घडली. संशयीताने महिलेस शिवीगाळ करीत तसेच बलात्कार करण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला. यावेळी पीडितेची मावस बहिण तिच्या मदतीला धावून आली असता संशयीताने तिलाही मारहाण केली. यावेळी त्याने दुकानासमोर पार्क केलेल्या वाहनाचे आणि मोबाईलचे नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
….