रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – अल्पवयीन मुलीशी विवाह करणे पडले महागात, पतीवर बलात्काराचा गुन्हा

by India Darpan
जुलै 7, 2021 | 9:50 am
in क्राईम डायरी
0
crime diary 1

बलात्कार प्रकरणी पतीवर गुन्हा
नाशिक : अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी प्रसुत झाल्याने ही बाब पोलीसात पोहचली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्कार, बालविवाह प्रतिबंध आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण नंदू जाधव (२० रा.अमृतानगर,पाथर्डी फाटा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत पतीचे नाव आहे. पीडिता व संशयीत पती पत्नी असून त्यांनी गेल्या वर्षी आदिवासी पध्दतीने विवाह केला आहे. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतांना संशयीताने तिला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार व तिच्याशी विवाह केला. याकाळात शरिरसंबध प्रस्तापित केल्याने सोळाव्या वर्षीच मुलगी गर्भवती राहून तिने गोंडस मुलास जन्म दिला आहे. प्रसुतीसाठी पीडिता जिल्हा रूग्णालयात दाखल झाल्याने हा प्रकार समोर आला असून अधिक तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.

….

रिक्षाचालकाकडून एकास मारहाण
नाशिक : कट मारल्याचा जाब विचारल्याने रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराने एकास बेदम मारहाण केल्याची घटना गंगापूररोडवरील मॅरेथॉन चौकात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन भानजी राठोड (२७ रा. आरटीओ कार्यालयामागे पेठरोड) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. राठोड मंगळवारी (दि.६) गंगापूररोड भागात गेला होता. मॅरेथॉन चौकातून तो पायी जात असतांना एमएच १५ झेड ८५५३ या अ‍ॅटोरिक्षाने त्यास कट मारला. याबाबत त्याने चालकास जाब विचारला असता चालकासह रिक्षात मागे बसलेल्या त्याच्या साथीदाराने राठोड यास बेदम मारहाण केली. या घटनेत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याने चेतन राठोड जखमी झाला असून अधिक तपास हवालदार कोल्हे करीत आहेत.

…..

महिलेची दागिणे असलेली पर्स लांबविली
नाशिक : गर्दीत खरेदी करणा-या महिलेच्या पर्सची चैन उघडून भामट्यांनी मिनी पर्स चोरून नेल्याची घटना वर्दळीच्या शालिमार भागात घडली. या पर्स मध्ये सुमारे ६६ हजार रुपए किमतीचे सोन्याचे दागिणे होते. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभांगी विशाल कुटे (रा.किर्लोस्कर कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. कुटे या सोमवारी (दि.५) आपल्या बहिणीस सोबत घेवून खरेदीसाठी शालिमार भागात गेल्या होत्या. दोघी बहिणी गर्दीत खरेदी करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी शुभांगी कुटे यांच्या खांद्यास अडकवलेल्या पर्सची चैन उघडून मिनी पर्स चोरून नेली. या पर्स मध्ये मंगळसुत्र आणि कर्णफुले असे सुमारे ६६ हजार रुपए किमतीचे अलंकार होते. अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान मोदींनी तब्बल डझनभर मंत्र्यांना दिला नारळ; रावसाहेब दानवे बचावले

Next Post

नाशिक – पार्किंगच्या वादातून दुकानदार महिलेस बलात्कार करण्याची धमकी

Next Post
crime 6

नाशिक - पार्किंगच्या वादातून दुकानदार महिलेस बलात्कार करण्याची धमकी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011