नाशिक – रिक्षा प्रवासात सहप्रवासी महिलेने वृद्धेकडील सोन्याचे दागिने व रोकड केली लंपास
नाशिक – रिक्षा प्रवासात सहप्रवासी महिलेने वृद्धेकडील सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना घटना घडली आहे. या चोरीप्रकरणी सावित्रीबाई परशराम झनकर (६५,रा. पार्कसाईड, हनुमान नगर) यांनी आडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या तक्रारीत झनकर यांनी म्हटले आहे की, शनिवारी दुपारच्या सुमारास हनुमान नगरहून कपालेश्वर नगरच्या दिशेने रिक्षाने जात असतांना सहप्रवासी म्हणून बसलेल्या महिलेने ६४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केले. याप्रकरणी आडगाव पोलिस तपास करीत आहेत.
घरातून सोन्याचे मंगळसूत्र केले लंपास
नाशिक – घरात कोणी नसल्याचा फायदा घेत वडाळा नाका येथील रेणुका नगर परिसरात एकाने घरातून सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. याप्रकरणी सरला अशोक कळकटे (५०, रा. वडाळानाका) यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत स्वप्निल चंद्रकांत देवकर (३०, रा. ता. चाळीसगाव) यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. संशयित स्वप्निल याने ४ मे रोजी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत दोन तोळे वजनाचे ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरून नेल्याचा संशय कळकटे यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत.
लॅपटॅाप व चांदीचे दागिने चोरीला
नाशिक – सिडकोतील महाजन नगर परिसरात तिघा चोरट्यांनी घरातून लॅपटॅाप व चांदीचे दागिने असा १७ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. १६ मे रोजी सकाळी ही चोरी झाली. याप्रकरणी गोरक्ष सुरेश मोरे (३१) यांनी अंबड पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. चोरट्याने घरातून लॅपटॅाप व चांदीचे दागिने चोरून नेले असून अंबड पोलिस चोरट्यांचा तपास करीत आहेत.