इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशभरात विविध प्रकारच्या गुन्ह्याच्या घटना घडत असतात. मात्र, कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. फॅमिली कोर्टात कौन्सिलिंगसाठी बोलावण्यात आलेल्या जोडप्यातील पतीने आपल्या पत्नीचा गळा कापून हत्या केल्याची धकाकादायक घटना कोर्टाच्या परिसरातच घडली आहे. कर्नाटकातील हसन जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.
थट्टेकेरे गावातील चैत्रा हिचा विवाह सात वर्षांपूर्वी शिवकुमार याच्याशी झाला होता. काही वर्षांनी दोघांमध्ये सातत्याने वाद होऊ लागले, संबंध ताणले गेले. त्यामुळे घटस्फोटासाठी या दोघांनीही अर्ज दाखल केला. शनिवारी त्यांची दिलजमाई घडवून आणण्यासाठी त्यांना कोर्टात बोलावले होते. विशेष म्हणजे हत्येच्या काही क्षणांपूर्वी फॅमिली कोर्टात या दोघांनीही सात वर्षांचे आपले लग्न टिकवण्याचा निर्णय घेतला होता.
आपआपसातील मतभेद संपवून पुन्हा एकदा नव्याने संसार करण्यासाठी ते दोघेही तयार झाले होते. यावेळी या व्यक्तीने बायकोची हत्या तर केलीच. तसेच तिच्यासोबत असलेल्या लहान मुलावरही त्याने हल्ला केला. मात्र आजूबाजूचे लोकं धावले म्हमून या लहान मुलाचा जीव वाचला. विशेष म्हणजे हत्येच्या काही क्षणांपूर्वी फॅमिली कोर्टात या दाम्पत्याने सात वर्षांचे आपले लग्न टिकवण्याचा निर्णय घेतला होता.
दोघांचे एक तास कौन्सिलिंग
हसन जिल्ह्यातील होलेनरसीपुरा फॅमिली कोर्टात या दोघांचे एक तास कौन्सिलिंग करण्यात आले होते. त्यात दोघांनी पुन्हा संसार करण्याचे ठरवले आणि त्यानंतर हे दोघेही बाहेर प़डले. चैत्रा जेव्हा बाहेर पडली तेव्हा पाठीमागे शिवकुमारही वॉशरुमपर्यंत गेला. धारदार हत्याराने त्याने चैत्राचा कळा कापला. या हल्ल्यानंतर तिच्या गळ्यातून खूप रक्त वाहिले. त्यानंतर त्याने मुलावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलगा बचावला.
शिवकुमारला अटक
हत्या केल्यानंतर शिवकुमार तिथून पळून जाण्याचया प्रयत्नात होता. मात्र आजूबाजूला असलेल्यांनी त्याला पकडले. शिवकुमार याला अटक करुन त्याच्याकडून हत्येसाठी वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. कौन्सिलिंगनंतर या दोघांमध्ये काय झाले याचा तपास आता करण्यात येतो आहे. कोर्टात त्याला धारदार हत्यार मिळाले कसे, ही ठरवून केलेली हत्या होती का, या अंगलनेही आता पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
Crime Husband Killed Wife in Court Premises