नोएडा (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – असे म्हणतात की, प्रेम हे कुणाचे कोणावरही होऊ शकते. आणि प्रेमासाठी काहीजण वाटेल ते तयार करायला तयार होतात ! अगदी नात्यातील कोणी व्यक्ती जर प्रेमाच्या आड येत असेल तर त्याचा जीव घ्यायला देखील काही जण मागे पुढे पाहत नाहीत, असे म्हटले जाते. त्यामुळे प्रेम हे आंधळे असते, असे म्हणतात.
नोएडात देखील अशीच एक भयानक दुर्दैवी आणि खळबळजनक घटना घडली. एका वृद्ध महिलेने आणि तिच्या प्रियकराच्या मदतीने तीन वर्षे वयाच्या नातीचा जीव घेतला. नोएडा सेंट्रल परिसरातील इलाबन्स गावात एका बांधकाम सुरू असलेल्या घरात ३ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी या मुलीच्या आजीने (वय ५०) आपली नात बेपत्ता झाल्याची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणाची चौकशी केली असता एक खळबळजनक खुलासा समोर आला की, खूद्द आजीच्या प्रियकराने या तीन वर्षांच्या मुलीची हत्या केली होती. ती निरागस मुलगी त्यांच्या प्रेमप्रकरण आणि लग्नात अडथळा वाटत होती. आत्या मामा अत्यंत अमानुष घटना म्हणजे आरोपींनी मुलीवर बलात्कार करून तिची विटा आणि दगडाने ठेचून हत्या केली होती.
या प्रकरणाचा खुलासा करत नोएडा पोलिसांनी आरोपी हेमंत (५५) याला खानपूर, बुलंदशहर येथील रहिवासी अटक केली आहे. सदर आरोपी हा गुंड असून या प्रकरणात आजीची भूमिकाही तपासली जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
नोएडा सेंट्रल येथील पोलीसांनी सांगितले की, मुलीचा मृतदेह एका घरात सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी हेमंतला अटक केली असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून तो हातगाडीवर भाजीपाल्याची विक्री करतो. मुलीचे वडील तुरुंगात असून आई तिला सोडून माहेरी गेली. मासूम आजीकडे राहत होता.
येथे मुलीची आजी आणि आरोपी हेमंत यांच्यात जवळीक वाढली होती आणि एकमेकांशी प्रेमसंबंध सुरू होते. हेमंत त्यांच्या घरी जात असे. हेमंतने प्रेमसंबंध व लग्नात अडथळे आणत असल्याचे समजून या मुलीचा वीट व दगडाने वार करून खून केला होता. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह इमारतीत पडलेल्या प्लायमध्ये लपवून ठेवण्यात आला होता.
मुलीचे वडील तुरुंगात असून आईने माहेर सोडल्या मुळे तीन वर्षांच्या मुलीसाठी आजीच सर्वस्व होती. मात्र, या हत्या प्रकरणातील आजीची भूमिका संशयास्पद असून त्याची चौकशी सुरू आहे. वास्तविक मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद आजीनेच दिली होती. मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली. पोलीस पथकाने निष्पाप मुलीची आई, आजी यांच्यासह कुटुंबातील ७५ हून अधिक जणांची चौकशी केली होती. तुरुंगातील वडिलांचीही चौकशी करण्यात आली. या तपासादरम्यान एका व्यक्तीचे या मुलीच्या आजीसोबत प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या खूनाचा खऱ्या अर्थाने उलगडा झाला.