नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महसूल विभागाच्या स्मार्ट रेशन कार्ड आणि महावितरण कामांच्या नावे खोटया वर्क ऑर्डर देवून जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील ठेकेदारास तब्बल साडे अकरा लाखास गंडा घातल्याचा समोर आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तौसिफ खान आयुब खान (रा. विवरे खुर्द ता.रावेर) यांनी तक्रार दाखल केली आहे. निखिल विजयानंद अहिरराव (४२ रा. लक्ष्मी निवास, मखमलाबाद रोड) असे फसवणूक करणा-याचे नाव आहे. २०१९ ते २०२२ दरम्यान संशयिताने वेगवेगळी कारणे सांगून ११ लाख ४० हजार रूपयांची रक्कम उकळली. या कामासाठी कोणतेही साहित्य,मशनरी न पुरविता खोटी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. ही बाब लक्षात येताच खान यांनी नाशिक गाठून पैश्यांसाठी तगादा लावला असता संशयिताने जीवे मारण्याची धमकी दिल्याने खान यांनी पोलिसात धाव घेतली.
फेसबुकवरील महाराष्ट्र उद्योजक या पेजवर जाहिरात
खान हे ठेकेदार असून यांच्या रावेरमधील ई-सेवा केंद्रात अर्ज नोंदणी, छपाईसह खासगी संस्थांची विविध कामे करण्यात येतात. २०१९ मध्ये संशयिताने इन्स्पायर इन्फ्रास्ट्रक्चर लि. या कंपनीतून फेसबुकवरील महाराष्ट्र उद्योजक या पेजवर जाहिरात केली होती. या जाहिरातीत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानसह इतरत्र स्मार्ट सोलर सर्व्हे, लाइट मीटर चेंजिंग, स्मार्ट रेशन कार्ड, सोलर वॉटर टँकसह ग्रामपंचायतीच्या कामांबाबत माहिती देण्यात आली होती.
अशी झाली फसवणूक
फेसबुकवरील जाहीरात बघून खान हे नाशिक येथे आले. त्यानंतर त्यांनी आहिरराव याच्याशी संपर्क साधला असता ही फसवणुक झाली. अहिरराव व त्याच्या तीन साथीदारांनी वन नेशन, वन रेशन अंतर्गत कामाची माहिती देत त्या अंतर्गत प्रतिकार्ड ९० रुपये आणि व्हेंडर नफा ४२ रुपये मिळतील असे आमिष दाखविले. यावेळी सहा महिन्यांत काम पूर्ण न झाल्यास दंड भरावा लागेल, असेही सांगण्यात आले. गुंतवणुकीवर जास्त मोबदल्याचे आमिष दाखविायात आल्याने खान यांनी गुंतवणुकीला होकार दर्शवून पुढील व्यवहार केले.
Crime Fake Work Orders Contractor Cheating
Nashik Police