India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक बस आग अपघात- डीएनए टेस्टमुळे पटली तीन मृतांची ओळख; मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द

India Darpan by India Darpan
October 12, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लक्झरी बस अग्नितांडव दुर्घटनेतील तिघा अनोळखी मृतदेहांची ओळख पटविण्यात यश आले आहे. डीएनए चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्याने वैद्यकिय प्रक्रिया पूर्ण करून संबधीतांचे मृतदेह मध्यरात्री नातेवाईकाच्या स्वाधिन करण्यात आले आहेत. गजानन शालीकराम लोणकर (२३, रा. आसेगाव, जि. वाशिम), हरिभाऊ तुकाराम भिसनकर (२८, रा. वाटखेड, जि. यवतमाळ), मीनेश यादव इंगळे (३७) अशी मृतांची नावे आहेत.

औरंगाबाद महामार्गावर कैलासनगर तपोवनाजवळ शनिवारी (दि. ८) पहाटे पाच वाजेच्या सुमारास खासगी लक्झरी बस व आयशर ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात १२ प्रवासी होरपळून ठार झाले होते. नातेवाइकांच्या मदतीने पोलीस व जिल्हा रुग्णालय प्रशासनाने रविवारपर्यंत नऊ मृतदेहांची ओळख पटविली होती. तिघा मृतदेहांच्या नातेवाइकांचे डीएनए नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सोमवारी (दि. १०) रात्री उशिरा डीएनए अहवाल यंत्रणेला प्राप्त झाला. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाइकांना सोपविण्यात आल्याचे आडगाव पोलिसांनी सांगितले.

दरम्यान या भीषण दुर्घटनेतील ४३ जखमींपैकी जिल्हा रुग्णालयात पाच तर आडगाव वैद्यकीय महाविद्यालयात एक व खासगी रुग्णालयात एक असे सात जखमींवर उपचार सुरू आहेत. उर्वरित सर्व जखमींना डिस्चार्ज देण्यात आला. बसमध्ये पाठीमागे झोपलेला बदली चालक आणि वाहक सुदैवाने बचावले असून त्यांच्यासह ट्रॅव्हल्सच्या संचालकांकडे चौकशी सुरू आहे. या तपासाबाबत आडगाव पोलिसांची वेगवेगळी पथके कार्यरत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी सांगितले

Nashik Fire Travel Bus Accident Death DNA Test Report


Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

प्रवासी महिलेचा विनयभंग करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

Next Post
प्रातिनिधीक फोटो

प्रवासी महिलेचा विनयभंग करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group