इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आयपीएलच्या क्वालिफायर २ सामन्यात मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर गेला तो फक्त शुभमन गिल याच्यामुळे. मात्र, आता चर्चा सुरू झाली आहे ती सारा आणि शुभमन गील यांच्या ब्रेकअपची. मात्र, ही सारा नक्की कोण सारा अली खान की सारा तेंडुलकर असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
शुभमन गील हा साराला डेट करत असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगल्या आहेत. मात्र, आता त्यांनी एकमेकांना अनफॉलो केल्याचे दिसत आहे. आयपीएल २०२३ चा दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजराच्या शुभमन गिलची खेळी चांगलीच चर्चेत आहे. शुभमन आपल्या खेळासोबतच खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे.
सारा आणि शुभमन एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेकदा ते दोघे एकत्र फिरताना देखील दिसले होते. मात्र दोघांनीही नात्यावर कधी उघडपणे प्रतिक्रिया दिली नाही. पण, आता त्या दोघांच्या नात्यात फूट पडल्याची माहिती समोर आली आहे. सारा आणि शुभमन गिलने सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. त्यामुळे, या दोघांमध्ये नेमकं काय चालले आहे, अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. अनेकांनी त्या दोघांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी
शुभमन साराला डेट करण्यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकरला डेट करत होता. मात्र, त्या दोघांचे फार पटत नसल्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो सारा अली खानला डेट करु लागला. शुभमन गिलचे हे आयपीएलच्या चालू हंगामातील तिसरे शतक आहे. गिलने या मोसमाच्या सुरुवातीला साखळी फेरीत सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शतके झळकावली होती.
चाहत्यांमध्ये गोंधळ
यंदा दमदार फॉर्मात सलेल्या शुभमन गिलने बॉलीवूड स्टार सारा अली खानला सोशल मीडियावर अनफॉलो केल्याच्या बातमीने चाहत्यांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला आहे. शुभमन गिल सारा अली खानसोबत दुबईत एका रोमँटिक डिनरसाठी दिसला होता. यानंतर त्यांच्या डेटींगच्या बातम्यांनी जोर पकडला होता. सारा अली खान आणि शुभमन गिल या दोघांनीही वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये त्यांच्या नात्याचे संकेत दिले होते. मात्र, आता दोघे वेगळे झाल्याचे दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, सारा अली खान आणि शुभमन गिल यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे.
जुना व्हिडिओ व्हायरल
दुसरीकडे, एक जुना व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे, ज्यामध्ये शुभमन गिल त्यांच्या डेटिंगच्या अफवांवर बोलत आहे. शुभमन गिल पंजाबी चॅट शो ‘दिल दियां गल्लान’मध्ये दिसला होता. शोमध्ये, क्रिकेटरला बॉलिवूडमधील सर्वात आवडती अभिनेत्रीचे नाव विचारण्यात आले. त्यावेळी शुभमनने सारा अली खानचे नाव घेतले. त्यानंतर त्याला विचारण्यात आले की, तो ‘सारा’ला डेट करत आहे का, ज्यावर त्याने ‘कदाचित’ असे उत्तर दिले. त्यानंतर होस्ट सोनम बाजवाने त्याला सत्य सांगण्यास सांगितले आणि म्हणाली, “सारा का सारा सच बोलो,” ज्यावर शुभमनने उत्तर दिले, “सारा दा सारा सच बोल दिया. कदाचित होय, कदाचित नाही.”
Cricketer Shubman Gill and Sara Breakup