India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पाटलीणवरुन अभिनेता किरण मानेही मैदानात… पोस्ट शेअर करुन म्हणाला..

India Darpan by India Darpan
May 27, 2023
in मनोरंजन
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नृत्यांगना गौतमी पाटील हिने पाटील हे आडनाव वापरु नये अशी मागणी करण्यात आली आहे. यावरुन बराच मोठा वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गौतमीच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिल्यानंतर आता अभिनेता किरण माने यांनीही पोस्ट लिहून पाटलीणवर भाष्य केले आहे.

अभिनेता किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,
…”एक छोटीशी चिमणीसुद्धा आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिव करते रे…” गौतम बुद्धांनी अंबठ्ठाला सांगीतलेलं हे वाक्य हे भारतीय साहित्यातलं नितांतसुंदर आणि आशयघन वाक्य आहे असं आ.ह. साळुंखे तात्या नेहमी म्हणतात. आपल्या संविधानातल्या ‘स्वातंत्र्य’ या मुल्याचं इतकं समर्पक स्पष्टीकरण दुसरीकडे कुठे क्वचितच सापडेल.

चिमणीला सुद्धा स्वत:च्या मनाप्रमाणं चिवचिवण्याची मुभा आहे… आपण तर माणूस आहोत. आपल्याला असं व्यक्त होण्याचं, मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य का मिळू नये??? एखाद्यानं काय बोलायचं… कसं वागायचं… स्वत:च्या घरात काय खायचं… कसले कपडे घालायचे… यावर बंधनं आणण्याचे प्रकार सुरू आहेतच… पण आता कळस झालाय. एका मुलीने पोटापाण्यासाठी काय करावं? किती पैसे घ्यावेत?? इथंपासून ते आता, तिनं कुठलं आडनांव लावावं??? यासाठी सुद्धा दुसरंच कुणीतरी जबरदस्ती करत आसंल… धमक्या देत आसंल तर हे लै म्हंजे लैच संतापजनक आणि लाजीरवाणं हाय.

गौतमी, जेव्हा तू चुकली होतीस, तुझ्या व्हल्गर हातवार्‍यांवर गदारोळ उठला होता, तेव्हा तू माफी मागीतली होतीस… पुन्हा ती चूक होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेतलीस. खरंतर त्यानंतरच तू लोकप्रियतेच्या पायर्‍या चढू लागलीस. आज तू जे करतेस त्यात आता ‘बिभत्स’ असं काहीही नाही. परफाॅर्मन्स करताना अंगभर कपडे असतात. तू ज्या अदाकार्‍या करतेस त्यावर ग्रामीण भागातली तरूण पोरं जीव ओवाळून टाकतात.. तुझ्या क्षेत्रात अशी लोकप्रियता लाखात एखादीला लाभते. तुझा डान्स हा उच्च दर्जाचा आहे की नाही, याविषयी प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं आणि त्या प्रत्येक मताचा आदर आहे… पण तरीही कुणीही हे नाकारू शकत नाही,की आजच्या तरूणाईमध्ये तुझी जबरदस्स्त ‘क्रेझ’ आहे.. तुझ्या स्टेजवरच्या फक्त एंट्रीनं तरूणाई पागल होते.. गांवखेड्यांत तू लोकप्रियतेचा कळस गाठला आहेस. तिथे मराठी सिनेमा-सिरीयलमधल्या टाॅपच्या अभिनेत्रींपेक्षा तू पाॅप्यूलर आहेस. तू हे यश एंजाॅय कर. बर्‍याचदा अशा यशाचा काळ छोटा असतो. जोवर आहे तोवर धमाल कर. तुझ्यात जिद्द आणि चिकाटी असेल तर याहूनही मोठे यश मिळवशील पुढे जाऊन. पण ‘आम्हाला वाटतंय तसंच तू वागावंस, तस्संच नाचावंस आणि आम्ही सांगतोय तेच नांव लावायचंस’ असं दरडावू पहाणार्‍यांना उंच उंच लांब उडवून लाव.

आज तरी तू आमच्या ग्रामीण भागातल्या मनोरंजनक्षेत्रातली ‘पाटलीण’ हायेस… रुबाबात नाच, बिनधास्त नाच ! ❤️

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0GXvWUtxnCeiu72Htu5yeVQshnbF48HAAPRPNvQo3zfNug39AbDep7LmLuxoshp2xl&id=1460418198&mibextid=Nif5oz

ACtor Kiran Mane on Gautami Patil Surname Controversy


Previous Post

अतिशय संतापजनक! तोंडात बोळा कोंबून नवजात अर्भकाला झुडपात फेकले; संभाजीनगरमधील घटना

Next Post

सारा आणि शुभमन गील यांचे ब्रेकअप? IPLमध्येच सगळं घडलं?

Next Post

सारा आणि शुभमन गील यांचे ब्रेकअप? IPLमध्येच सगळं घडलं?

ताज्या बातम्या

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

May 31, 2023

नाफेडच्या उन्हाळ कांदा खरेदीचा शुभारंभ… इतके मेट्रिक टन खरेदी करणार… डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नांना यश

May 31, 2023

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना फायर सेसबाबत मोठा दिलासा; झाला हा मोठा निर्णय

May 31, 2023

या मालिकेच्या सेटवर लागली आग, खोली जळून खाक

May 31, 2023

देवळा तालुक्यात भंगार गोदामाला आग… परिसरात धुराचे मोठे लोट (व्हिडिओ)

May 31, 2023

मालेगावात अवैधरित्या या औषधांची सर्रास विक्री; पोलिसांनी जप्त केला मोठा साठा (व्हिडिओ)

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group