मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकदिवसीय क्रिकेट अधिक रंगतदार करण्यासाठी पूर्वीप्रमाणेच बॉलवर लाळेचा वापर करण्यास अनुमती द्यायला हवी. तसेच एका सामन्यातीन दोन डावांसाठी दोन चेंडूचा वापर बंद व्हायला हवा, अशा काही सूचना मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने केल्या आहेत.
टी-२०मुळे क्रिकेटचा थरार काही तासांत अनुभवण्याचा आनंद क्रिकेटप्रेमी घेताहेत. टी-२०, टी-१० या प्रकारांना अधिक पसंती मिळू लागली आहे. पन्नास षटकांचे सामने काहीसे कंटाळवाणे होऊ लागले आहेत. खेळाडूंमध्येही वनडे क्रिक्रेट खेळण्याबाबत हवा असलेला संयम दिसून येत नाहीये. तसेच झटपट क्रिकेटमुळे झटपट पैसादेखील मिळतोय. क्रिकेटपटू आणि क्रिकेटरसिक दोघांनाही एकदिवसीय सामने नकोसे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर हे सामने रंजक बनविण्यासाठी सचिन तेंडुलकरने काही सूचना केल्या आहेत. त्यामध्ये बॉलवर लाळेचा वापर करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचनेचा समावेश आहे.
करोनामुळे बॉलवर लाळ वापरण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता या निर्णयाचा पुनर्विचार होऊन शंभर वर्षे जुनी परंपरा पुन्हा सुरू करण्यात यावी, याकडे तेंडुलकरने लक्ष वेधले आहे. सध्या प्रत्येक संघाच्या डावात नवीन चेंडूंचा नियम आहे. जेव्हा तुमच्याकडे ५० षटकांमध्ये दोन नवीन चेंडू असतात, अशा वेळी तुम्हाला रिव्हर्स स्विंगची कला पाहायला मिळत नाही. डावातील ४० वे षटक चालू असताना, प्रत्येक चेंडूसाठी हे फक्त २० वे षटक असते आणि चेंडू फक्त ३० षटकांच्या सुमारास रिव्हर्स स्विंग होतो. त्यामुळे मला वाटते की दोन नवीन चेंडूंमुळे रिव्हर्स स्विंग ही महत्त्वाची गोष्ट एकदिवसीय क्रिकेटमधून गायब होत आहे आणि गोलंदाजांच्या दृष्टिकोनातून ही बाब चुकीची आहे असेही सचिनने म्हटले आहे.
अध्यक्षपदावर थेट उत्तर देण्यास नकार
सध्या बरेच माजी क्रिकेटपटू क्रिकेट मंडळांचे अध्यक्षपद भूषविताहेत. त्या पार्श्वभूमीवर तूदेखील बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारणार का, या प्रश्नावर सचिनने थेट उत्तर देणे टाळले. ‘मी वेगवान गोलंदाजी करू शकत नाही. एक वेळ असा होता ज्यावेळेस सौरव गांगुलीने विकेट काढले होते, त्यावेळेस तो १४० किलोमीटरच्या वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होता. पण नंतर त्याला कमरेचा त्रास जाणवला. त्यामुळे मी १४० किलोमीटरच्या वेगाने गोलंदाजी करून शकत नाही,’ असे तो म्हणाला.
Cricketer Sachin Tendulkar on BCCI Chief One Day Cricket Match