India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

…म्हणून आलिया भट्ट अभिनेता वरुण धवनवर संतापली

India Darpan by India Darpan
March 19, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूडमधील सध्याच्या घडीची सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. काही महिन्यांपूर्वी तिचे बाळंतपण झाले. आणि त्यानंतरही काहीच काळात तिने स्वतःला अगदी पूर्वीप्रमाणे मेन्टेन केले आहे. योग्य आहार आणि आवश्यक व्यायाम करून ती पुन्हा पूर्वपदावर आली आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने स्वतःला सिद्ध करत या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

आपल्या करिअरच्या बाबतीत ध्येयवादी असलेली आलिया भट्ट कायमच प्रसिद्धीझोतात असते. कधी स्टार किड्स म्हणून टीका तर कधी उत्तम अभिनेत्री म्हणून तिचे कौतुकही होत आहे. आलिया भट्टने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःला सिद्ध केलं आहे. आलियाने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. त्याचे काही फोटोही समोर आले आहेत. मात्र यात एक विचित्र प्रकार घडल्याचे समोर आले. वाढदिवसाच्या फोटोवरून आलिया भट्ट अभिनेता वरुण धवनवर चांगलीच चिडल्याचे दिसते आहे.

वाढदिवसानिमित्त आलियाच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेक कलाकारांनी देखील तिला शुभेच्छा दिल्या. बॉलिवूडमधील तिचा मित्र-परिवार, कुटुंबियांनी आलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यासह अभिनेता वरुण धवननेही इन्स्टाग्रामवर आलियाच्या वाढदिवसाबाबत पोस्ट केली. “आलिया तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता कुठे तू ३० वर्षांची झाली आहेस”, असे वरुणने म्हटले. या शुभेच्छा देताना वरुणने आलियाचा एक फोटोही सोबत शेअर केला आहे. या फोटोत ते दोघेही एका मंचावर मांडी घालून बसल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोवरुनच आलियाही वरुण धवनवर संतापल्याचे दिसत आहे.

आलियाने वरुणच्या या पोस्टवर कमेंट करत त्याला जाब विचारला आहे. “माझा यापेक्षा जास्त चांगला फोटो तू शेअर करू शकला असतास, मग हा फोटो का पोस्ट केलास?, असा सवाल आलियाने वरुणला विचारला आहे. त्यानंतर आलिया आणि वरुणमध्ये रंगलेले मजेशीर संभाषणही यात आपल्याला वाचायला मिळते. आलिया भट्ट आणि वरुण धवन हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. त्या दोघांनी ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून एकत्र करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ते दोघेही ‘कलंक’ या चित्रपटात एकत्र दिसले. त्यांच्या या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला.

Actress Alia Bhat Angry on Actor Varun Dhawan


Previous Post

BCCI अध्यक्ष होणार का? वन डे क्रिकेट बोअरिंग का वाटते? मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला…

Next Post

कॅनडाहून तब्बल ७०० विद्यार्थी परतणार भारतात; तेही चक्क शिक्षण अर्धवट सोडून, पण का?

Next Post
प्रातिनिधीक फोटो

कॅनडाहून तब्बल ७०० विद्यार्थी परतणार भारतात; तेही चक्क शिक्षण अर्धवट सोडून, पण का?

ताज्या बातम्या

येत्या १ एप्रिलपासून बदलणार हे सर्व नियम… आजच घ्या जाणून… अन्यथा…

March 24, 2023

करौली बाबाच्या अनेक बाबी उघड… दररोज करोडोंची उलाढाल.. आश्रमात आहेत या शाही सुविधा… अॅम्ब्युलन्सचा यासाठी होतो वापर…

March 24, 2023

पुणेरी जाऊ द्या… आता या सोलापुरी बॅनरची जोरदार चर्चा… असं काय आहे त्यात? तुम्हीच बघा

March 24, 2023

बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी… येथे निघाल्या तब्बल ५३६९ जागा… येथे आणि असा करा अर्ज

March 24, 2023

रेशीम शेती एकरात… मिळेल पैसा लाखात….

March 24, 2023

वॉशिंग मशीन…. गुजरात निरमा…. बॅनरने वेधले विधिमंडळात सर्वांचे लक्ष

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group